गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रशिक्षित वाहनचालकांना देश-विदेशात २२ लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार

by Gautam Sancheti
ऑगस्ट 31, 2024 | 12:13 am
in संमिश्र वार्ता
0
amravati motor vehicle1

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा): देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीचे कामे वेगाने सुरु असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहनचालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता आदी उपस्थित होते.

देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा, पर्यावरण व वेळेत बचत होत आहे. वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येत आहे. यातून प्रशिक्षित वाहनचालक निर्माण करण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे राज्यातील पहिले केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहनचालक तयार होतील, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. त्यामध्ये अपघात प्रवण स्थळाचा शोध घेऊन दुरुस्ती करणे, वाहननिर्मिती करणाऱ्या उद्योगांना वाहनामध्ये एअर बॅग, ऑटोमॅटिक ब्रेकींग सिस्टीम, आधुनिक तंत्राचा वापर करुन अपघात नियंत्रण सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन, सीएनजी, इॅथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनाचा एक सशक्त व परवडणाऱ्या पर्यायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होत आहे. प्रशिक्षित वाहनचालकांना देश-विदेशात २२ लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कौशल्य विकास क्षेत्रात मोठी मागणी असून प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी केले.

प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या केंद्रामध्ये चांगले प्रशिक्षित वाहनचालक तयार होवून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्ताचा विकास झपाट्याने होत असून पर्यावरणपूरक इंधनाला ते प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे देशाच्या विकासात हातभार लागत असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातील केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इशांत राजगुरु यांनी केले. तर राखी गुप्ता यांनी आभार मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post

हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीत भाजप की काँग्रेस…बघा हा नवा ओपिनियन पोल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 74

हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीत भाजप की काँग्रेस…बघा हा नवा ओपिनियन पोल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011