सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावात श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील १६४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

by India Darpan
मार्च 2, 2025 | 5:01 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 03 02 at 14.55.05 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हजारो कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो. पण आज विदर्भाचे पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडा येथे दोनशे कोटींची विकासकामे मला दोन लाख कोटींची वाटत आहे. कारण धापेवाडा हे माझे गाव आहे. आता येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा तर कायापालट होणारच आहे, शिवाय गावाचाही पर्यटन व तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास होणार आहे, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी धापेवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

धापेवाडा विकास आराखड्यांतर्गत १६४.६१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग व नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांच्या वतीने धापेवाडा येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, सावनेरचे आमदार आशीष देशमुख, काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर, उमरेडचे आमदार संजय मेश्राम, वारकरी संप्रदायातील श्रीहरी बापू वेळेकर महाराज व यशवंत पराते महाराज यां, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नासुप्रचे सभापती संजय मीणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच धापेवाडा येथील स्वयंभू श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी भानुप्रतापसिंग पवार, आदित्य पवार, विलास वैद्य, अरुणराव चिखले आणि निखील गडकरी यांचीही यावेळी उपस्थिती होती.

धापेवाडा येथे टेक्स्टाईल पार्क, मंदिराचा जिर्णोद्धार, जलशुद्धीकरण प्रकल्प, स्टेडियम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत. ही परिवर्तनाची सुरुवात लोकांच्या सहकार्यानेच होत आहे. विकास आराखडा मंजूर झाला. आता धापेवाड्याला आदर्श गाव करण्याची जबाबदारी गावाची आहे. महाराष्ट्रातील सुंदर-स्वच्छ गावाचा पुरस्कार आपल्या गावाला मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही ना. श्री. गडकरी यांनी केले. यावेळी कारंजा ते पांढुर्णा हा रस्ता मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.

गडकरी म्हणाले, ‘धापेवाडा टेक्स्टाईलमध्ये कोश्याचा साड्या तयार झाल्या. आज या साड्यांना भारतात मागणी आहे. ज्या गावातून हातमाग हद्दपार झाला होता, त्याठिकाणी येथील महिला उत्तम साड्या विणत आहेत. हे आव्हान आम्ही स्वीकारले आणि त्यात यश मिळाले. धापेवाडा, सावनेर, खापा या परिसरातील महिलांना उत्तम प्रशिक्षण देण्यात येणार आहे.’ धापेवाडा टेक्स्टाईलच्या साड्या जगभरात जातील असा विश्वासही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

‘फार्मर बिझनेस स्कूल’ची गरज
पूर्वी संत्रा हे या भागातील मुख्य पिक होते. पण आज एका एकरात चार ते आठ टन संत्रा होतो. स्पेनमध्ये मात्र ३० ते ४० क्विंटलपर्यंत संत्रा होतो. स्पेनच्या दौऱ्यात संत्र्याचे उत्पन्न जास्त असण्याचे कारण जाणून घेतले. तेथील फार्मर बिझनेस स्कूलला भेट दिली. त्या शाळेतील संचालक मंडळात नारायण मूर्ती आहेत. नारायण मूर्तींचे पाच मिनिटांचे भाषण ऐकल्यावर आपली जबाबदारी वाढल्यासारखे वाटले. विदर्भातही फार्मर बिझनेस स्कूल सुरू करण्याची गरज आहे. येथील युवा शेतकऱ्याने कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार केले पाहिजे असा उद्देश आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा होणार कायापालट
धापेवाडा श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान मंदिराचा विकास आराखडा, पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तसेच धापेवाडा येथील नदीचे रुंदीकरण व खोलीकरण या कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिर परिसरात सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात आला. यात १६४.६१ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. यामध्ये संपूर्ण मंदिर परिसराच्या विकासकामांचा समावेश आहे. विठ्ठल मंदिर परिसरात प्रार्थना सभा, प्रदक्षिणा मार्ग, प्रशासकीय इमारत, कोलबा स्वामी मंदिर परिसराचा विकास, भक्त निवास, चंद्रभागा नदीच्या काठावर स्वामी कोलबास्वामींची ५१ फुटाची मूर्ती या कामांचा समावेश आहे. या कामांतर्गत गर्भगृहाचा आकार वाढविण्यात येईल. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी चंद्रभागा नदीवर नव्या पुलाचे काम होणार आहे. २० बस, १५० चारचाकी, ५०० दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था, इलेक्ट्रिक बस, उद्यान, सौरउर्जा यंत्रणा, नदीचे सौंदर्यीकरण या कामांचाही समावेश आहे. त्यासाठी ८९ लाख रुपयांची स्वच्छता योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पुराची समस्या दूर होईल व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोराडीच्या धरतीवर धापेवाडाचा विकास – श्री. बावनकुळे
धापेवाड्याच्या विकासाची स्वप्नपूर्ती होणार आहे. कोराडी मंदिराच्या धरतीवर धापेवाड्याचा विकास होईल आणि मी स्वतः त्यात पूर्ण लक्ष घालणार आहे, असा शब्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्याचवेळी धापेवाडा येथे एक उत्तम धर्मादाय हॉस्पिटल होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

स्पेन दौऱ्याच्या माहितीपटाचे लोकार्पण
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी तसेच सौ. कांचनताई गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी अलीकडेच स्पेनला जाऊन आले. अॅग्रोव्हिजन, महाऑरेंज आणि सह्याद्री अॅग्रोफार्मर प्रोड्युसर यांनी हा दौरा आयोजित केला. स्पेनमधील टँगो जातीचे संत्र, त्याचे उत्पादन, पॅकेजिंग, प्रोसेसिंग, नर्सरीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सुधीर दिवे, रवी बोरटकर, प्रशांत कुकडे, मनोज जवंजाळ, श्रीधर ठाकरे, स्वप्नील धोटे, राकेश मानकर, नवीन पेठे, विशाल लंगोटे, पुष्पक खापरे, निलेश रोडे, अपूर्व जवंजाळ, उद्दव पोटाणे, मोरेश्वर वानखेडे यांच्या उपस्थितीत स्पेन दौऱ्याच्या माहितीपटाचे लोकार्पण झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार…

Next Post

केरळमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

India Darpan

Next Post
Untitled 1

केरळमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011