शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमच्या सरकारने जात-पात न बघता लोकांची सेवा केली….नितीन गडकरी

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2024 | 1:34 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
WhatsApp Image 2024 11 10 at 21.13.19 2


नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने कधीही जात-पात बघून सेवाभावात बदल केला नाही. आयुष्यमान योजना असो वा लाडकी बहीण योजना असो; जात आणि धर्म बघून योजनांचा लाभ दिला गेला नाही. सर्वाना लाभ मिळेल याची काळजी आम्ही घेतली. याउलट काँग्रेसने कायम जातीयवादाचे विष पेरले, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर कोहळे, उत्तर नागपूरमध्ये डॉ. मिलिंद माने व पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे यांच्य प्रचारार्थ ना. श्री. नितीन गडकरी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, ‘आमच्यासाठी राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे काम करताना आम्ही कधीही जात-पात बघितली नाही, बघत नाही. आम्ही दलितांच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करण्यात आला. मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा दीक्षाभूमीचे काम बंद पडले होते. आमच्या कार्यकाळात ते काम पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी संबंध असलेल्या चिचोलीला महत्त्व प्राप्त करून दिले. कामठी येथील ड्रॅगन टेम्पल आमच्या काळात जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले. कामठीतील मेट्रो स्टेशनला ‘ड्रॅगन टेम्पल स्टेशन’ असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.’

कमाल चौकात माझ्या आईच्या नावाने डायग्नोसिस सेंटर सुरू केले जात आहे. त्याठिकाणी महागड्या तपासण्या अतिशय माफक दरात करून दिल्या जातील, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली. ‘मी पालकमंत्री होतो तेव्हा मला इंजिनिअरिंग कॉलेज मिळाले होते. मी नाही घेतले. शिक्षकांचा अर्धा पगार घ्या, नोकरी लावून द्यायला पैसे घ्या अशा भानगडीत पडायचे नव्हते. त्यामुळे मला ते कामच करायचे नव्हते. अनेक नेत्यांनी इंजिनियरिंग, डीएड-बीएड कॉलेज घेतले. माझ्या वाट्याला आलेले कॉलेज मी अंजूमन शिक्षण संस्थेला दिले. त्याठिकाणी हजारो मुस्लीम तरुण-तरुणी शिकले,’ याचाही गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.

गडकरी म्हणाले, ‘दहा वर्षांमध्ये नागपुरात एक लाख कोटींपेक्षा जास्त निधीची कामे झालीत. नागपूरची मेट्रो कामठीपर्यंत जाणार आहे. नागपूर बदलत आहे. नागपूर हे देशातील पहिले शहर आहे, जिथे ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पाणी मिळते. पक्के सिमेंट काँक्रिटचे रस्ते झाले आहेत. पुढची अनेक वर्षे हे रस्ते टिकणार आहेत. त्यामुळे उमेदवार मत मागायला येतील, तेव्हा लोक काम विचारतील. त्यावेळी काँग्रेसकडे उत्तर नसेल.’

हलबा समाजाच्या समस्या सोडवल्या
काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. पण काँग्रेस नेत्यांची गरिबी हटली. सर्वसामान्य लोकांची गरिबी हटली नाही. साठ वर्षांत काँग्रेसने हलबा समाजाचे प्रश्न सोडवले नाही. आम्ही दहा वर्षांत हलबा समाजाच्या समस्या सोडवल्या, असे गडकरी म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसला मोठा धक्का…पाचवेळा निवडून आलेले आमदार ‘आप’मध्ये

Next Post

राज्यातील या आठ जिल्ह्यात पावसाची शक्यता

Next Post
rain1

राज्यातील या आठ जिल्ह्यात पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011