शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभेतून काँग्रेसवर सडकून टीका….

नोव्हेंबर 8, 2024 | 6:42 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
WhatsApp Image 2024 11 07 at 20.21.06

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूर शहराचा विकास रोखून धरला होता. मिहानला विरोध करणारेही काँग्रेसचेच नेते होते. विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत यांनीच मिहानच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. आज त्याच मिहानमध्ये मोठ्या कंपन्या आल्या आणि ८८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. १ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामे शहरात झाली. आज नागपूरचे चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) केले.

गडकरी यांच्या हस्ते दक्षिण-पश्चिम, पश्चिम व उत्तर नागपूरच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ‘नागपूर शहराच्या विकासाची ही प्रक्रिया थांबायला नको. कारण हा प्रश्न शहराच्या भविष्याचा आहे. ही उमेदवाराचे भविष्य ठरविणारी निवडणूक नसून जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे,’ असेही ते म्हणाले. १९४७ पासून आजपर्यंत देशाच्या इतिहासात काँग्रेसला मुंबई, नागपूर दिल्लीमध्ये राज्य करण्याची संधी मिळाली. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसने सत्ता उपभोगली. दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि त्यापूर्वी चार वर्षे अटलजींच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकास केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

मी विधानपरिषदेचा आमदार होतो तेव्हा रिंगरोडच्या निर्मितीसाठी २३ वेळा पाठपुरावा केला. अजनी चौकात वारंवार अपघात व्हायचे. सगळी वाहतूक शहरातून व्हायची. रिंगरोडचे काम थांबले होते. एका शाळेतील शिक्षिकेने मोठे आंदोलन रिंगरोडसाठी केले होते. आपण रिंगरोड तर बांधलाच, पण मी मंत्री झाल्यावर साडेचारशे कोटी रुपये देऊन सिमेंट काँक्रिटचा रस्ता केला. आता रिंगरोडवर १३५ लोक बसू शकतील अशी फ्लॅश चार्जिंगवर धावणारी इलेक्ट्रिक बस सुरू होत आहे. या बसचे भाडे डिझेल बसच्या तुलनेत ३० टक्के कमी असेल, असेही गडकरी म्हणाले.

आज आपली नागपूर मेट्रो भारतातील सर्वांत चांगली मेट्रो आहे. गेल्या दहा वर्षांत पाण्यासाठी एकही मोर्चा निघालेला नाही. चोवीस तास पाणी देण्याचे आव्हान स्वीकारले. ते यशस्वी करून दाखवले. आता जलकुंभ आणि नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. चोवीस तास पाण्याची योजना यशस्वी करून दाखविणारे हे पहिले शहर आहे. शहरात मजबुत असे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधले. ऑरेंज सिटी स्ट्रिट चांगली होत आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण केंद्र तयार होणार आहे. व्यायाम शाळा देखील उभारली जाणार आहे. दीड ते दोन हजार आसन क्षमतेचे मोठे सभागृह निर्माण केले जाईल. सुसज्ज असे भाजी बाजार-मटण मार्केट तयार होणार आहे, याचा ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.

काँग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
‘काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार केला. संविधान बदलणार असल्याचे पसरवले. मात्र या देशात संविधानाचे तुकडे कुणी केले असतील, तर ते काँग्रेसने केले आहेत. आमच्यावर संविधान बदलाचा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,’ अशी टीका ना. श्री. गडकरी यांनी केली.

शहराच्या विकासात फडणवीस यांचे मोठे योगदान
रिंग रोडवरील कोतवालनगर चौकात दक्षिण-पश्चिमचे महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. या सभेला हिंगण्याचे आमदार समीर मेघे, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, संदीप जोशी, प्रकाश भोयर, मुन्ना यादव, राजू हडप, श्री. गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवेंद्र यांनी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मोठ्या प्रमाणात निधी दिला. नागपूरची जनता विकासकामांना मत देईल असा विश्वास आहे. त्यामुळे देवेंद्र यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केला.

कोहळेंच्या रुपात प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा
कोहळेंच्या रुपाने एक प्रामाणिक कार्यकर्ता पश्चिम नागपूरला उमेदवार म्हणून लाभला आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. बोरगाव येथे पश्चिम नागपूरचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या निवडणूक कार्यालयाचे ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी महापौर दशांकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मिलिंद माने यांच्या विजयाचा निर्धार करा
डॉ. मिलिंद माने यांनी यापूर्वी एकदा उत्तर नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या विजयाचा निर्धार करा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. वैशाली नगर येथे उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद माने, भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाविकास आघाडीचा….महाराष्ट्रात तेलंगणा पॅटर्न!

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ दिवसात ९ सभा…नाशिक येथे आज सभा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ दिवसात ९ सभा…नाशिक येथे आज सभा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011