नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा झंझावाती दौरा उद्या, ७ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होत आहे.
येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांत गडकरी यांच्या तब्बल ५० जाहीरसभा होतील. प्रदेश भाजपने गडकरी यांच्या प्रचार दौऱ्यास अंतिम स्वरूप दिले असून, त्यांच्या सोबत भाजप आणि महायुतीचे अन्य ज्येष्ठ नेते प्रचारात सहभागी होतील. तसेच १६, १७ आणि १८ नोव्हेंबर या काळात अर्थात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात देखील गडकरी यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले जात आहे.
त्या संदर्भातही प्रदेश भाजपातर्फे सर्व जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सभेच्या तयारी बाबत सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. सर्व जाहिरसभा भव्य स्वरूपात व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने जय्यत तयारी केली आहे.