गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जागतिक दर्जाचे शिक्षण द्या; पण मूल्येही शिकवा!…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2024 | 1:07 am
in संमिश्र वार्ता
0
1000034155

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण द्या. त्यांना स्पर्धेच्या युगातील प्रत्येक नवी गोष्ट शिकवा. पण त्याचवेळी संस्कार आणि मूल्यांचेही शिक्षण द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.

पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावर आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विबग्योर समूहाच्या शाळेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विलास काळे, संस्थेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ल, उपाध्यक्ष नूतन कोलसकर, सीईओ किरणजित पन्नू आदींची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘नागपुरात एक उत्तम शिक्षण संस्था सुरू होत आहे, याचा आनंद आहे. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासोबत मूल्याधिष्ठित शिक्षणही काळाची गरज आहे. संस्कार देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगला माणूस कसा घडवता येईल, याचा विचार करावा लागेल. कारण मूल्य आणि संस्कार हीच आपली जमेची बाजू आहे. हे सारे शिक्षणातून देणेच शक्य आहे.’ आज देशाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहणार आहे. असे मनुष्यबळ चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणातून निर्माण होईल, असेही गडकरी म्हणाले.

नागपूर होतेय एज्युकेशन हब
नागपुरात आता एज्युकेशन हब म्हणून नावारुपाला येत आहे. अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था नागपुरात आल्या आहेत. पारडी येथे ११० एकरमध्ये सिम्बायोसिस आले आहे. त्याच्याच शेजारी ४९ एकरमध्ये नरसी मोनजी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था येत आहे. याशिवाय इंटरनॅशनल लॉ स्कूल, आयआयएम, ट्रिपल आयटी सुद्धा नागपुरात आहे, याचाही गडकरींनी आवर्जून उल्लेख केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खेलो इंडिया स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंच्या संख्येत लक्षणीय वाढ…

Next Post

येवल्यात अंबादास बनकर यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड….महायुतीच्या बैठकीत निर्णय

Next Post
IMG 20241020 WA0257 1 e1729454579449

येवल्यात अंबादास बनकर यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड….महायुतीच्या बैठकीत निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011