इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडमध्ये रविारी झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यात आज आमदार नितेश राणे यांनी टोकाचा इशारा दिला आहे. तर चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार नितेश राणे यांनी जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई – बहिणींनीचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ आमच्यासारख्या ९६ कुळी मराठ्यांमध्ये आहे. मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
तर चित्रा वाघ यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही…’डीजे’वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर….आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला…! असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा दावा फेटाळून लावला आहे.