मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे भाजपला पुन्हा एकदा मैत्रीची साद घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठावाडा मुक्तीसंग्रामानिमित्त झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यानंतर शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार का या चर्चांना काल उधाण आले. आजही ही चर्चा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार सुरुच असून त्यांना सेना – भाजप एकत्र येणार असल्याचे वाटत आहे.
पण, दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वेगळीच शंका उपस्थितीत केली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितले की,
सेना भाजप युतीचे विधान केवळ बीकेसीतील एमएमआरडीए पूल कोसळण्यावरून माध्यमांचे लक्ष हटवण्यासाठी देण्यात आले होते का ? आता या ट्विटला शिवसेना उत्तर देईल की नाही हे कळेलच. पण, राणे यांनी उपस्थितीत केलेली शंका मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1439085864479563776?s=20