इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी मुद्द्यावर राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी एनआय वृत्तसंस्थेशी बोलतांना केलेल्या भाष्यामुळे महाराष्ट्रात आता त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
खासदार दुबे म्हणाले की, तुम्ही लोक आमच्या पैशावर जगत आहात. तुमचे उद्योग कोणते आहेत? तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल, पण, त्यांचा कोणताही काऱखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं. टाटा, बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात. पण, टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो, तुम्ही कोणता टँक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खजिनाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे. मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ दुबे यांनी ओकली.
राज ठाकरे यांच्या ‘मारा पण व्हिडिओ बनवू नका’ या वक्तव्यावरही दुबे यांनी प्रतिक्रिया दिली. जर तुम्ही इतके धाडसी असाल आणि हिंदी बोलणाऱ्यांना माराल तर तुम्ही उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्या सर्वांना मारावे. जर तुम्ही इतके मोठे ‘बॉस’ असाल तर महाराष्ट्रातून बाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या – ‘तुमको पटाका पटाका के मारेंगे’… आम्ही सर्व मराठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांचा आदर करतो. बीएमसी निवडणूक जवळ आली आहे आणि म्हणूनच राज आणि उद्धव हे हलके राजकारण करत आहेत. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहिमला जाऊन माहिम दर्ग्यासमोर कोणत्याही हिंदी किंवा उर्दू भाषिकांना मारावे असेही त्यांनी सांगितले.