इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात बंगळुरच्या विशेष न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. निर्मला सीतारमण यांच्यावर निवडणूक रोख्यांच्या (इलेक्ट्रॅाल बाँड) माध्यमातून वसुली केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाने शुक्रवारी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जनाधिकार संघर्ष परिषदेचे (JSP) आदर्श अय्यर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात बेंगळुरमध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच निर्मला सीतारण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
आदर्श अय्यर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसुली केल्याचा आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने बंगळुरु पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रकरणावर पुढील सुनावणी १० ऑक्टोंबरला होणार आहे.