नाशिक- दोरउडी खेळात विशेष प्राविण्य मिळवीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व अशिया बुक ऑफ रेकॉर्ड स्पर्धेत ‘ग्रँड मास्टर’ हा मानाचा किताब मिळविल्याबद्दल राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज खेळाडू सात्विक निरगुडेचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सात्विकने केलेल्या विशेष कामगिरी बद्दल त्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जयराम गवळी,देवराम सैंदाणे, अश्विनी निरगुडे यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.