नवी दिल्ली – आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा फेब्रुवारीतच दिला होता. त्यामुळे नीरव मोदी लवकरच भारताच्या हवाली होणार आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे.