सुदर्शन सारडा, ओझर
विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटप बाबत सर्वत्र धामधूम सुरू असताना निफाडमध्ये महाविकास आघाडीच्या अनिल कदम यांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा शिलेदार कोण यावर गत आठवड्यापासून सुरू असलेले घमासान, शक्तीप्रदर्शन आणि हेव्यादाव्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर पूर्णविराम देत दिलीप बनकर यांच्याच पारड्यात उमेदवारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांना एबी फॉर्म देखील काही दिवसांपूर्वी दिला असल्याने त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे खात्रीलायक वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि भाजपचे निफाड विधानसभा अध्यक्ष यतीन कदम यांच्यात सुरू असलेल्या उमेदवारीच्या टशन मध्ये अखेर अजित पवार यांनी क्विक सर्वेचा पर्याय निवडला होता. यात त्यांनी त्यांच्याच पातळीवर काही बाबी स्पष्ट केल्या. यात गत विधानसभा निवडणुकीत आमदार बनकर यांना ९६३५४ म्हणजे ४७.५% मते मिळाली तर त्यांच्या पाठोपाठ ३८.८ टक्के मते मिळवून अनिल कदम दुसऱ्या स्थानी होते. त्यावेळी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अपक्ष यतीन रावसाहेब कदम यांना २४०४६ मतांसह ११.८% टक्के मते घेतली. दिलीप बनकर आणि यतीन कदम यांच्या टक्यांच्या फरकात ३५.७% टक्क्यांचा फरक होता. त्यानंतर कदम यांनी भाजप मध्ये प्रवेश करत संपूर्ण विधानसभा मतदार संघ पिंजून काढला.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुती मनापसून सोबत नसताना देखील निफाड मध्ये भाजपला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून कदम यांनी वरिष्ठांना समजून सांगितले. अशातच महायुती कायम राहिली आणि अजित पवारांच्या वाट्याला निफाड मतदारसंघ गेला.यतीन कदम यांनीही आपला प्रयत्न कायम ठेवत मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या.निवडणूक घोषित झाल्यानंतर यतीन कदम आणि दिलीप बनकर यांच्यात उमेदवारी वरून चढाओढ सुरू असताना कदम यांनीही सर्वच स्तरातून फिल्डींग लावत आपला दावा कायम ठेवला परंतु एकूणच राज्याच्या इतर मतदार संघात दिलेल्या गेलेल्या उमेदवारी वरून आणि निफाडसाठी विशेष क्विक सर्वेच्या आधारे अजित पवारांनी आमदार दिलीप बनकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकल्याचे विश्वासू वृत्त हाती आले असून शनिवारी सायंकाळी अथवा रविवारी सकाळी पक्षा कडून तशी औपचारिक घोषणा होईल.यात यतीन कदम आपल्या उमेदवारी बाबत नेमकी काय राजकीय भूमिका घेतात हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोणी कोणास झुलवले?
सूरवातीला दिलीप बनकर यांची उमेदवारी निश्चित असताना यतीन कदम यांनी आपली ठाम बाजू मांडत मला उमेदवारी द्या असे पक्ष श्रेष्ठींना सांगितले परंतु ती जागा अजित पवारांच्या वाट्याला गेल्याने कदम यांनी पवारांना देखील अनिल कदमांना मीच कसा शह देऊ शकतो आणि बनकर यांच्या पेक्षा मी कसा सरस हे पटवून दिले.त्यानंतर पहिल्या दोन यादीत दिलीप बनकर यांचे नाव आले नाही. एकंदरीत या सर्व घडामोडीतून भाजपने यतीन यांना राष्ट्रवादीकडे पाठवत बनकर यांना झुलवले की दिलीप बनकर यांना भाजपच्या विनंतीवरून अजित पवार यांनी झुलवले की आणखी काय झाले हे ठाऊक नसले तरी अजितदादांच्या विश्वासू शिलेदाराला तिसऱ्या यादी पर्यंत वाट पाहावी लागते ही नेमकी बनकर खेळी आहे की भाजप खेळी करून यतीन यांना अपक्ष उभे करते याबाबत पाडवा पहाट पर्यंत वाट पाहावी लागेल.