पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सद्यस्थितीत कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमान वाढत आहे द्राक्ष काढणी सुरू झाला आहे तापमान वाढल्यामुळे द्राक्ष, गहू, कांदा, भाजीपाला या पिकांना नित्याने पाणी द्यावे लागत आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, वीज ट्रीप होणे, शॉर्ट सर्किट होणे, देखभाली अभावी ट्रान्सफॉर्मर जळणे यामुळे शेतकऱ्यांना शेतीपिकाना पाणी देण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरणाच्या या विजेच्या लंपनडावामुळे शेतमालाची होरपळ होऊ लागली आहे. यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झालेला असतांना मात्र महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळ करीत आहे. शेतकऱ्यांच्या सयमांचा अंत न पाहता त्यांना शेतीपंपासाठी किमान ८ तास सुरळीत वीज पुरवठा करा अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल असा गर्भित इशारा निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी निफाड तालुक्यातील विजेच्या प्रश्नावर नाशिक येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकी दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विजेच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारीची तत्काळ दखल घेत महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांचे दालनात संबंधित अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता यांची बैठक घेत शेतकर्यांना सुरळीत ८ तास वीज पुरवठा करणेकामी सूचना दिल्या. त्यात खालील तांत्रिक अडचणी दूर करणेकामी तत्काळ कामे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यात निफाड तालुक्यातील विजेच्या समस्या दुर करण्यासाठी कृषी आकस्मिक निधी (ACF), सुधारित वितरण क्षेत्र (RDSS), आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (आमदार निधी) व सामान्य सुधारणा विकास प्रणाली (NDSI) अशा विविध योजनांतर्गत फिडर विलगीकरण करणे, नवीन उपकेंद्र प्रस्तावित करणे, ट्रान्सफार्मर बदलणे, ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविणे, अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, ट्रान्सफार्मरची पेटी बसविणे व दुरुस्ती करणे, विविध उपकेंद्रांची दुरुस्ती करणे व जोड वहिनी टाकणे,सिंगल फेजिंग योजनेसाठी आवश्यक त्या ठिकाणी SDT बसविणे अशी कामे प्रस्तावित केलेली असून काही कामे मंजूर आहे. मंजूर असलेली कामे तत्काळ सुरु करणे.कामे अद्यापही पूर्णत्वास न आल्याने तालुक्यातील वीज ग्राहकांना त्यामुळे विजेच्या प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. सदरची कामे हि लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच गोदाकाठ परिसरामध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर असून या भागातील प्रश्न कायमचा निकाली काढण्यात यावा. ३३/११ के.व्ही.चांदोरी उपकेंद्रातून सायखेडा व बेरवाडी या २ फिडरला वीज पुरवठा केला जातो.
सदर दोन्ही फिडर अतिभारीत आहे. ३३/११ के.व्ही.नायगाव सबस्टेशन अतिभारीत असून यावरून पिंपळगाव निपाणी, सावळी, बेरवाडी गावाचा काही भाग, चाटोरी गावातील लिंब लव्हान भाग असे एकूण १२ ते १६ ट्रान्सफार्मर जोडलेले आहे. तसेच दारणासांगवी गावाचे एकूण १९ ट्रान्सफार्मर जोडलेले आहे. सदर शेतकऱ्याना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही तारेच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड होत असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. याकरीता लाईन कॅपिसीटर टाकणे. दारणासांगवी येथे नव्याने मंजूर केलेले ३३/११ के.व्ही. दारणासांगवी उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरु करणे. तसेच करंजगाव, भेंडाळी व कोकणगाव अतिरिक्त पॉवर रोहित्र (५MVA) चे काम देखील तात्काळ मार्गी लावण्यात यावे. याबरोबरच तालुक्यातील अडचणीचा ठरलेल्या दिक्षी फिडरवरील अतिरिक्त भार कमी करून त्या भागातील शेतकऱ्यांना येणारी विजेची अडचण तात्काळ दूर करावी.शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करणे कामी पिंपळगाव बसवंत येथील रानमळा करिता स्वतंत्र फिडर टाकणे. मुखेड.सबस्टेशन ओव्हरलोड असून क्षमता वाढविणे. कोकणगाव उपकेंद्र नवीन ५ MVA चा पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे..शिरसगाव फिडर बायफरगेशन करणे..साकोरे मिग फिडर बायफरगेशन करणे..साकोरे मिग फिडर.कोकणगाव वरून नवीन प्रस्तावित करणे.. चांदोरी उपकेंद्र अतिभारीत असल्याने अतिरिक्त ५ MVA ट्रान्सफार्मर टाकणे. इनलाइन पोल टाकणे. (दोन पोल मधील जास्त अंतर असल्याने लाईनचा झोल पडून शॉर्टसर्किट होऊन शेती पिके जळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे दोन पोलमधील गाळा कमी करण्यासाठी अतिरिक्त पोल टाकणे) दिक्षी फिडर लोड जास्त असल्याने दिक्षी गाव व दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे हे गावे स्वतंत्र करणे. तसेच दिक्षी फिडरसाठी ओझर मिग सबस्टेशन मधून बॅक फिडिंग लाईन टाकणे..पिंपळस फिडर बायफरगेशन करणे.नांदूरमध्यमेश्वर व जळगाव सबस्टेशन कसबे सुकेणे येथे जोडणे. त्यासाठी ३३ के.व्ही.आयसोलेटर टाकणे. कुंदेवाडी सबस्टेशन . रानवड सबस्टेशनला जोडणे..जळगाव फिडरवर.कुंदेवाडी जोंडण्यासाठी ITI कॉलेजजवळ ३३ के.व्ही.डबल पोल आयसोलेटर टाकणे. ३३ के.व्ही.उगाव (खेडे) उपकेंद्राला बॅक फिडिंग देण्यासाठी.कुंदेवाडी फिडर वरून २.५० कि.मी.ची.लाईन टाकणे.नैताळे सबस्टेशनला बॅक फिडिंग देण्यासाठी.विंचूर सबस्टेशन वरून ३ कि.मी.ची.लाईन टाकणे. तसेच नैताळे येथे१३२ केव्हीचे सबस्टेशन लवकरात लवकर प्रस्तावित करण्यात यावे अशा प्रकारची मागणी देखील या आढावा बैठकीदरम्यान आमदार दिलीपराव बनकर यांनी महावितरण कंपनीचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत (वावी) २२० केव्ही सबस्टेशन टावर उभारणीचे काम पूर्ण झालेले असून सबस्टेशनमधून ३३ केव्ही वाहिनी काढण्यासबंधीचा प्रस्ताव मुख्य कार्यालयात पाठविला आहे.तसेच नाशिक जिल्ह्यातील पहिले ४४० केव्ही सबस्टेशन सारोळे खु. येथे प्रस्तावित केलेले असून जागेसंबंधित काम पूर्ण झालेले असून अंतिम मंजुरीसाठी सादर केलेले असल्याचे महापारेषणचे कार्यकारी अभियंता नवलाखे यांनी यावेळी सांगितले. यामुळे बाभळेश्वर ४४० केव्ही सबस्टेशनवर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना ३ महिन्याच्या रोटेशनमध्ये २४ तासात रात्री अपरात्री वीज पुरवठा केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी वीज पुरवठा देत असतांना महावितरणचा कोणताही कर्मचारी रात्रीच्या वेळी कर्तव्यावर हजर नसतो. काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या दिवशी तो दुरुस्त केला जातो. जर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात असेल तर महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कर्तव्यावर हजर रहावे तरच शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करण्यात यावा.शेतकऱ्यांसोबत सन्मानाची वागणूक ठेवा, काही अधिकारी शेतकऱ्यांशी सन्मानाने वागत नसल्याच्या तक्रारी आहे. परत अशा तक्रारी आल्यास सबंधित अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी दिला. विविध योजना अंतर्गत मंजूर असलेली व कार्यारंभ आदेश दिलेली सर्व कामे मार्च २०२३ अखेर पर्यत पूर्ण करण्याचे आश्वासन देखील मुख्य अभियंता यांनी यावेळी दिले.
याबैठकी प्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, चांदवड उपविभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, महापारेषणचे कार्यकारी अभियंता नवलाखे साहेब, पिंपळगाव बसवंतचे उप कार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, निफाडचे उप कार्यकारी अभियंता निलेश नागरे, ओझरचे उप कार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील, चांदोरीचे सेक्शन इंजिनीअर मोरे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिध्दार्थ वनारसे, सुरेश खोडे, सोमनाथ मोरे, राजेंद्र खोडे, भूषण धनवटे, बापू गडाख, सोपान खालकर, जयराम सांगळे, रावसाहेब चौधरी, संदीप कातकाडे, सोपान बोराडे, सचिन यादव, प्रकाश बागुल, मोहन खापरे, ज्ञानेश्वर खाडे आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.