लासलगाव – निफाड तालुका हा गेली काही दिवस नाशिक जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या वाढण्यासाठी अग्रेसर आहे. असे असले तरी लाॅकडाऊनने निफाड तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या कमालीची घटत असल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना थोडेसे तरी हायसे वाटले आहे.
निफाड तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या घटत असली तरी निफाड तालुक्यातील कोरोना कोविड उपचार केंद्र व रूग्णालयात रूग्णांना जागा नाही. आजही खाजगी रूग्णालयात बेडस मिळत नाही.तसेच रेमडेसिवीयर व ऑक्सिजनची गरज अपुरी आहे. निफाड तालुक्यातील कोरोना रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर यशस्वी उपचार करणारे वैद्यकीय व्यवसायिक यांनी आम्हास जादा दर घेता येत नाही म्हणुन रेमडेसिवीयर इंजेक्शन मिळत नाही. ऑक्सिजनची सिलेंडर्स मिळत नाहीत.त्यासाठी बरेच परीश्रम घ्यावे लागतात. परंतु तेच रेमडेसिवीयर पेशंटचे नातेवाईक काळ्याबाजारात आठ ते दहा हजार रूपये मोजून अवघ्या एक तासात आणतात तोच अनुभव ऑक्सिजनचे सिलेंडर्सबाबतही आहे. एकुण निफाड तालुक्यातील रेमडेसिवीयर आणि ऑक्सिजन सिलेडर्सचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सर्रास होत असतांना अन्न आणि औषध खात्याचे व पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी मात्र या काळाबाजाराकडे दुर्दैवाने दुर्लक्ष करीत कारवाई करीत नाहीत. त्याबद्दल जनतेत या दोन्ही खात्याचे अधिकारी वर्गाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.
आजही निफाड तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथम क्रमांकावर असली तरी कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. तसेच कोरोना रूग्णाची बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्कयावरून थेट ८३ टक्के पर्यत गेले आहे.