लासलगाव – आज निफाड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने आज मागील काही आठवड्यापासून दररोज ३०० च्या आसपास येणारी कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाची संख्या आज कमी झाली असून आज दिवसभरात निफाड तालुक्यातील नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८५ झाली असल्याची माहीती निफाड तालुका कोरोना संपर्क अधिकारी डाॅ. चेतन काळे यांनी दिली.
निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या १५६७९ असूनआजपर्यंत एकूण बरे झालेले रूग्णांची संख्या १३३५४ असल्याने आता रूग्ण बरे होण्याचे शेकडा प्रमाणही वाढले असून आज बरे होण्याचा दर (Recovery Rate ) ८५.१७ टक्के झाला आहे. निफाड तालुक्यात आता पर्यंत कोरोनामुळे एकूण ४८६ मृत्यू झाले असुन मृत्यू दर- ३.१० टक्के आहे. तो सुध्दा कमी करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवेत आहेत .आज उपचाराखालील रुग्ण १८३९असून आज एकूण झालेल्या टेस्ट ७५५ झाल्या आहेत.
आज मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र येथील चालु असलेल्या १८-४४ वयोगटातील लसीकरणासाठी ५ मे व ६ मे या दोन दिवसांचे Online Slot (500 Slots) ओपन होणार आहेत. तरी ज्यांचे Online Registration झालेले आहेत त्यांनी Schedule Appointment मध्ये जाऊन Slot Book करावा अशी माहीती संपर्क अधिकारी डाॅ चेतन काळे यांनी दिली. तसेच बुधवारी निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारे लसीकरण लस उपलब्ध न झाल्याने उद्या बुधवारी ५ मे रोजी होणार नाही.अशी माहिती देण्यात आली.