निफाड – निफाड शहरापासून जवळच असणाऱ्या रसलपुर फाटा येथे मधुकर उमाजी जमदाडे रा. नागपूर यांना सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे भासवून त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम लंपास करण्याची घटना घडली. या बाबत निफाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे
१५ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मधुकर उमाजी जमदाडे वय ६१ राहणार नागपूर हे रसलपुर फाटा येथील दुर्गा हॉटेल जवळ असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गाडीच्या बाजूला थांबून आम्ही सीआयडी इन्स्पेक्टर असून चरस गांजाची चौकशी चालू आहे. असे सांगून तुमच्याकडील किमती वस्तू व पैसे व्यवस्थित सांभाळून ठेवण्यास सांगितले. जमदाडे यांनी त्यांच्याकडील असलेले एक तोळा सोन्याची अंगठी किंमत वीस हजार रुपये आणि रोख रक्कम पंचवीस हजार रुपये असे रुमालात गुंडाळून दिले. सदरचा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज हात चलाखीने त्यांच्या गाडीच्या डिकीत ठेवायचे नाटक करून लंपास करण्यात आला. याबाबत पोलिसात भादवि कलम ४२० सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास एएसआय माळी हे करीत आहेत.