पिंपळगाव बसवंत: २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी नुकतीच शासनस्तरावरून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.यात सुचविलेल्या विविध विकास कामासाठी ५ कोटीची मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली
यामध्ये पिंपळगाव बसवंत येथील प्रजिमा ५२ चिंचखेड रोड ते बालाजी मंदीर रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१० लक्ष), भुसे म्हाळसाकोरे शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), थेरगाव ते जिव्हाळे शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), ओणे येथील सोसायटी ते पवार हळदे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), उगाव ब्राम्हणगाव वनस (राजीव गांधी बंधारा लगतचा) रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), शिंगवे येथील प्रजिमा २७ ते बन्सी डेर्ले वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), पालखेड येथील शिंदे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), कसबे सुकेणे येथील गंगापूर कॅनल चारी नं.३ ते चारी नं.५ मधील (रु.दक्षिण बाजुकडील) रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), आहेरगाव पालखेड रस्ता ते मोरे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), आहेरगाव स्मशानभूमी ते माळोदे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), आहेरगाव येथील नेत्रावती नदी ते उन्हाळे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), नांदुर्डी येथील दावले वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), नांदुर्डी येथील ब्राम्हणगाव वनस (रु.खेडे शिवरस्ता) रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), उंबरखेड ते साकोरे चिंचखेड रस्त्याची सुधारणा करणे (रु.१५ लक्ष), कोठुरे येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), करंजगाव येथील प्रजिमा ४९ ते वल्टे कोटकर वस्ती रस्त्यावर सरस्वती नाल्यावर स्लब ड्रेन बांधणे व रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), बेहेड सोलटेकडी ते वालवे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), मुखेड आहेरगाव रस्ता ते नामदेव शेळके वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.३ लक्ष), मुखेड आहेरगाव रस्ता ते जाधव पवार वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु. २ लक्ष), सायखेडा बस स्थानक ते कॉलेजरोड रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), सायखेडा येथील देवी मंदीर ते कुरण रस्ता खडीकरण करणे (रु.५ लक्ष ), साकोरे येथील माडीचा रस्ता (विजय नामदेव बोरस्ते वस्ती) सुधारणा करणे (रु. १० लक्ष), मौजे सुकेणे येथील जुना नाशिकवाट रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), रौळस येथील निफाडे रस्त्यावर कुशारे वस्तीपर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे (रु.५ लक्ष), कुंभारी येथील सफरवाडी रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), लोणवाडी येथे काजळी नाल्यावर चोपडे वस्तीस जोडणाऱ्या रस्त्यावर मोरीचे बांधकाम करणे (रु.१० लक्ष), खेरवाडी येथील ओझर रस्ता ते बाळा आमराई रस्ता ते चारी नं.१५ ची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), वडनेर भैरव – पाचोरे वणी रस्ता ते आहेरगाव रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), पाचोरे वणी ते गोंडेगाव रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), रामा ३५ ते पाळदे वस्ती सोनगाव रामनगर भेंडाळी महाजनपूर शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), दावचवाडी येथील मधुकर धुमाळ यांच्या वस्तीपासून धनगर वस्ती पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), दावचवाडी येथील रामा २७ ते ज्ञानेश्वर धुमाळ यांची वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), शिरसगाव हनुमाननगर ते जुना ओणे रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), दात्याणे येथील ओझर ते गोंडेगाव चारी नं.१६ रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष ), खानगावथडी येथील रामा २३ ते गिते वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष) कारसुळ ते भास्करराव पगार वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), देवपुर येथील श्री संत जनार्दन स्वामी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (रु.५ लक्ष), दिक्षी जिव्हाळे शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), भेंडाळी राममंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (रु. ५ लक्ष), रामनगर ते लिंबलव्हान सावळी रस्त्याची सुधारणा करणे(रु. १० लक्ष), वडाळी नजिक गावांतर्गत रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), शिंपीटाकळी दारणासांगवी शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), महाजनपुर येथील डेअरी ते भापकर वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), चाटोरी येथील संतु पाटील हिरे वस्ती ते कदम वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), नागापूर गणेश मंदीर ते खालकर वस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (रु. ५ लक्ष), नारायणटेंभी-पिंपळगाव रोड ते बारअंबे (रु.जुना शिरसगाव) रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), गोंडेगाव ते नदीचा (रु.लिफ्ट इरिगेशन) रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), औरंगपूर ते भुसे शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), करंजी खुर्द येथील ठोंबरी रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), वऱ्हेदारणा येथील स्मशानभुमी जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), चेहडी खुर्द येथील पवार वस्ती ते गायधाड रस्त्याची सुधारणा करणे (रु. १० लक्ष), लालपाडी येथील गणपती मंदिर आडवाट रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), सावरगाव पालखेड रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), नांदुर खुर्द येथे गावांतर्गत स्ट्रीटलाईट बसविणे (रु. ५ लक्ष) चितेगाव येथील अशोक बोराडे वस्ती ते वामन गाडे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), चितेगाव येथील सुकदेव शेलार वस्ती ते सचिन खैरे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे (रु. ५ लक्ष), ब्राम्हणवाडे सोमठाणे रस्ता ते ज्ञानेश्वर घुमरे रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), कोकणगाव साकोरे ओझर शिव रस्त्याची सुधारणा करणे (रु.५ लक्ष), चापडगाव फाटा ते कडवा कॅनॉल औरंगापुर रस्त्याची सुधारणा करणे (रु. २० लक्ष), दिक्षी ते जनार्दन स्वामी आश्रम ते नवनाथ मंडलिक रेल्वे लाईन रस्त्याची सुधारणा करणे (रु.१० लक्ष), कुंदेवाडी रेल्वे स्टेशन ते ताडगे वस्ती रस्त्यावरील मोरीचे बांधकाम करणे (रु.५ लक्ष), पिंपळगाव बसवंत ते बेंदमळा रस्त्याची सुधारणा करणे(रु. १० लक्ष), दावचवाडी ते कुंभारी रस्त्याची सुधारणा करणे (रु.१५ लक्ष) आदी विकास कामे मंजूर झालेली असून यामुळे मतदार संघातील विविध भागातील रस्त्यांचा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली. सदर कामे मंजूरीकामी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री छगन भुजबळ व प्रशासकीय अधिकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असून निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार दिलीप बनकर यांनी आभार व्यक्त केले.