लासलगाव -आज निफाड पंचायत समितीच्या सभागृहात निफाड तालुका आरोग्य विभागाचा वतीने संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मागच्या लाटेतील आढावा घेण्यात आला. बऱ्यापैकी पेशंटची संख्या निफाड तालुक्यात कमी होऊन लवकरच तालुका पूर्व पदावर आणण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर कर्मचारी व सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत. यामध्ये तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये आज असलेल्या पेशंटची संख्या भविष्यात कोणत्या प्रकारे नियोजन करता येईल याचे मार्गदर्शन संबंधित डॉक्टरांकडून मागवण्यात आले. जेणेकरून पहिल्या टप्प्यात लाट थोपवता येईल मागचे अनुभव लक्षात घेता ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्या डॉक्टरांनी मोकळेपणाने बैठकीत मांडल्या. पुढील काळात लहान मुलांवर कोरोनाचा संभाव्य होणारा धोका लक्षात घेता त्यावरील उपाय योजना व आरोग्य यंत्रणेकडून कशा पद्धतीने काम करून घेता येईल अशा पद्धतीच्या सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर यांच्या सूचना ऐकून घेतल्या. याप्रसंगी सभापती सुलभा पवार पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे गटविकास अधिकारी संदीप कराड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवलसिंग चव्हाण डॉक्टर चेतन काळे सदस्य पंडितराव आहेर, संजय शेवाळे, शंकरराव संगमनेरे उपस्थित होते