ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य करत असलेली सध्याची महायुती म्हणजे राज्याला अधोगतीकडे नेणारी असून बहिणींना पैसे देतात अन् दाजींचे खिसे कापतात असे काही धोरण सध्या सुरू असून निफाड तालुक्याचे शाश्वत विकास आणि समृद्ध धोरण पुन्हा आणण्यासाठी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल कदम यांनी केले. ते ओझर येथे प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी खासदार राजाभाऊ वाजे होते.
खासदार वाजे यांनी सिन्नरला खासदारकी मिळाल्याने तिकडे जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली त्यामुळे आता खऱ्याअर्थाने शेजार धर्म निभवण्याची वेळ आल्याने दोन्ही ठिकाणी महाविकासचा झेंडा फडकविने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.विधानसभेला माझा निसटता पराभव झाल्यानंतर साडेचार वर्षात मी खासदार होतो हे निष्ठेचे फळ असल्याचे सांगितले.खंडेराव महाराज मंदिर परिसरात झालेल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मी अनिल कदम यांची मेहनत पाहिली असून त्यांच्यातील उमेद आणि जिगर ही अतिशय उच्च असल्याने पुन्हा निफाडकरांना एक अभ्यासू उमेदवार विधी मंडळात पाठवण्याचे आवाहन भगरे यांनी केले.
काँग्रेस नेते दीपक बोरस्ते,सुभाष कराड यांनी मनोगत व्यक्त करताना दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागत म्हणाले की ज्या शरद पवार यांनी पाच वेळा उमेदवारी देऊनही त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवण्याची वेळ आल्याचे सांगत कदम यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले.
गौरव पानगव्हाणे यांनी अनिल कदम हे एक सक्षम नेतृत्व असून यांच्याशिवाय निफाडचा विकास होऊच शकत नाही असे सांगितले. दिगंबर गीते यांनी सत्ताधारी सरकारवर चौफेर तोफ डागली. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर यांनी सध्याचं सरकार हे जाहिरात बाज असून योजना द्वारे वेड्यात काढून केवळ चमकोगिरी करण्याचे काम केल्याचे सांगत अनिल कदम हे भावी मंत्री असल्याचे सांगून मशालच्या बाजूने ऊभे राहण्याचे आवाहन केले. राजेंद्र मोगल यांनी शेतीचा ढासळत चालकेला आलेख हा चिंता वाढवणारा असून शेतकऱ्याचे प्रमुख प्रश्न तडीस नेण्यासाठी अनिल कदम यांना निवडणूक देण्याचे आवाहन केले.प्रकाश महाले यांनी ओझरकर एकदिलाने अनिल कदम यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याने कुणीही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
श्रीजित अनिल कदम यांनी केलेल्या पहिल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले.त्यांनी आपल्या वडिलांचे विविध सामाजिक दातृत्वाचे पैलू सांगत वडिलांना निवडून देण्याचे आव्हान केले.यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पगार आणि तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी केले.