सुदर्शन सारडा
नाशिक:निफाड विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारी वरून सुरू असलेलं रणकंदन दिलीप बनकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शमले असताना बनकर यांचे प्रतिस्पर्धी यतीन कदम यांनी महायुतीचा धर्म पाळत विधानसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत पक्ष आदेश पाळला. यामुळे निफाडची राजकीय लढाई तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी महायुती कडून राष्ट्रवादी काँगेस पक्षाची अधिकृत उमेदवारी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना जाहीर झाली.त्यानंतर यतीन कदम यांनी त्यांच्या निवासस्थानी मेळावा घेत कार्यकर्त्यांची बाजू समजून घेत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे सूतोवाच केले.उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर पत्रक प्रसिध्द करत निवडणूक न निर्णय घेतला. सदर पत्रकात यतीन कदम यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा झाल्यानंतर त्यांनी पक्ष आणि महायुतीचा आदेश मानून विधानसभेच्या रणांगणात थांबण्याचा निर्णय घेतल्याने आता दिलीप बनकर(महायुती)अनिल कदम(महाविकास आघाडी)आणि गुरुदेव कांदे (प्रहार) यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान दिलीप बनकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपची सर्व कार्यकारिणी उपस्थित होती.अर्ज दाखल केल्यानंतर बनकर यांनी शक्तिप्रदर्शन करत सभा घेतली यात भाजपच्या दोन तीन नेत्यांनी भाषणं केली.
माघारी नंतर चित्र स्पष्ट होईल परंतु यतीन कदम यांनी दावेदारी करताना मांडलेले मत पाहता ते दिलीप बनकर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होतात की आणखी कुणाला पाठिंबा देतात हे काही दिवसांनी स्पष्ट होईल.