सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे रामसर स्थळ असलेल्या नांदूरमधमेश्वर अभयारण्यात असा साजरा झाला जागतिक पाणथळ दिन

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2023 | 10:18 am
in स्थानिक बातम्या
0
3VDH7 scaled e1675486083162

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. चापडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक वन्यजीव विभागातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भूषविले तर ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ताकाका उगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ.उत्तमराव डेर्ले, डॉ. अविनाश घोळवे, पक्षीमित्र आनंद बोरा, चापडगावचे सरपंच बबड दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सायखेडा येथील व्ही.एन.नाईक महाविद्यालय तसेच जनता इंग्रजी शाळा, निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालय, भाऊसाहेब नगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालय या शाळांतील तीनशेहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पाणथळ भूमी संरक्षणाची शपथ दिली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, अध्यक्ष गणेश रणदिवे यांनी पाणथळ भूमीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहून योगदान देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात विद्यार्थी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यातील खुल्या संवादवजा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक वन रक्षक गणेश रणदिवे, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले तसेच इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.

नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याविषयी संक्षिप्त माहिती:
भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या ७५ रामसर स्थळांपैकी नांदूरमधमेश्वर हे २८ व्या क्रमांकाचे रामसर स्थळ आहे तर महाराष्ट्रातील ३ रामसर स्थळांपैकी प्रथम क्रमांकाचे रामसर स्थळ आहे. सुमारे ११९८.६५७ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात ५३६ प्रकारच्या जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती आढळतात. तसेच येथे ७ प्रकारचे सस्तन वन्यप्राणी, ३०० जातींचे पक्षी, २४ प्रकारचे मासे आणि तब्बल ४१ प्रकारची फुलपाखरे आढळतात.बर्ड लाईफ इंटरनॅशनल या संस्थेने निश्चित केलेल्या महत्त्वाच्या पक्षीविषयक क्षेत्रांमध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या 9 जागतिक उड्डाण मार्गांपैकी मध्य आशियायी उड्डाणमार्गाच्या कक्षेत येत असून ते स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी सोयीचा आणि सुरक्षित निवारा तसेच हिवाळी क्षेत्र उपलब्ध करून देते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भटक्या कुत्र्याने घेतला तरुणाच्या हाताला चावा

Next Post

लक्ष्मण महाडिक यांना कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार जाहीर

Next Post
IMG २०२२१००८ १६४४१६ e1675493817338

लक्ष्मण महाडिक यांना कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

11111111

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
crime1

रिक्षा प्रवासात महिलेचे पावणे दोन लाख रूपयाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास…

जून 8, 2025
PICV8YK

डीआरडीओने १० उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित…

जून 8, 2025
rainfall alert e1699421697419

राज्यात इतका पाऊस…तर मुंबई शहर जिल्ह्यात काल सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

जून 8, 2025
nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011