लासलगाव – कोरोनामुळे गेली दोन तीन महिने न्यायालयात कामकाज फारस होत नाही.त्यामुळे पक्षकारही येत नसल्याने निफाड वकील संघाचे जागेतील एकमेव चहाची कॅटीन बंद आहे. त्यामुळे उत्पन्न बंद झाले असतांना चहा कॅटीन चालक रामा उर्फ रामनाथ एकनाथ इंगळे यांचे पत्नीचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला. तीच्यावर उपचार करून हाॅस्पीटलचे बिल कसे भरावयाचे या विंवचनेत रामनाथ होता. पण, निफाड न्यायालयातील वकीलांनी सामाजिक बांधीलकीतून वर्गणी करून ४८ हजार ५५१ रूपयांची रक्कम गोळा केली. त्यानंतर ही रक्क्म उपचाराच्या बिलासाठी रामनाथकडे सुपूर्द केली.या छोट्याशा मदतीतून निफाड न्यायालयातील वकीलांनी प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपली.
आज दुपारी रामा इंगळे यास ४८ हजार ५५१ रुपये ही रक्कम या वकीलांनी अदा केली. त्यास मदतीचा चेक व रोख रक्कम निफाड वकील संघाचे अध्यक्ष अंबादास आवारे , विधीज्ञ अण्णा साहेब भोसले , इद्रभान रायते , रामेश्वर कोल्हे , कैलास मापारी , बी.जी. कुलकर्णी , पुंडलिक काळे , रमेश ठाकरे , चेतन घुगे व केशव शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.