बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही; छगन भुजबळ

ऑक्टोबर 29, 2022 | 3:43 pm
in स्थानिक बातम्या
0
f43e4fec 6aaf 4cef bce1 d87ece3395a8 e1667038330615

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी मेळाव्या प्रसंगी उपस्थितांना दिला.

काकासाहेब नगर, रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत, संचलित ‘कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगाम शुभारंभ छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार नरेंद्र दराडे,आमदार हिरामण खोसकर,आमदार नितीन पवार, आ. सुहास कांदे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,श्रीराम शेटे, मविप्रचे सरचिटणीस ऍड.नितीन ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, के.के.वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ, माणिकराव बोरस्ते, चांगदेवराव होळकर, सुरेशबाबा पाटील, राजेंद्र डोखळे, नानासाहेब महाले, हंसराज वडघुले, विष्णुपंत म्हैसधुने, प्रा.डॉ.बाळासाहेब पिंगळे, प्रकाश दायमा, विश्वासराव मोरे, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, दत्तात्रय डुकरे, हरिश्चंद्र भवर, बाळासाहेब बनकर, राजाभाऊ शेलार, तानाजी बनकर, दिगंबर गीते, रामभाऊ माळोदे, गणेश बनकर, पुरुषोत्तम कडलग, दत्तात्रय पाटील, सरपंच अलका बनकर, संगीता गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असून त्यांना दिलासा देण्याची केंद्र राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना काय अडचणी आहे. याची विचारपूस करण्याची गरज आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच पक्षभेद असले तरी शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. निवडणूका आल्यावर आपआपले झेंडे काढू मात्र विकासाच्या कामासाठी एक होऊन काम करूया असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, निफाड मधील कारखाने सुरू करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांचे सातत्याने प्रयत्न करत असून शरद पवार साहेब व अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रानवड कारखाना सुरू झाला. या कारखान्याचे खऱ्या अर्थाने चीज बनकर यांनी केले आहे. तसेच आता निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी दिलीप बनकर प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हितासाठी कारखाने सुरू होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका ठेवावी असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिकमधूनच सगळं पाणी पुढे मराठवाड्याकडे जात तरी देखील नाशिकचे कारखाने बंद पडले. आणि मराठवाडा परिसरातील कारखाने मात्र सुरू राहिले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, एअरबस प्रकल्पाचे काम जेव्हा टाटा यांना मिळाले त्यावेळी सर्वात प्रथम टाटा यांना पत्र लिहून नाशिकच्या एचएएल मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ हा प्रकल्प नाशिकला द्या अशी विनंती केली होती. मात्र हा प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्याबद्दल अतिशय दु:ख असून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ‘ड्रायपोर्ट’ करणार असे गेल्या काही वर्षांपासून केवळ आपण ऐकत आलो आहे. ते ही आता गुजरातला गेले तर आश्चर्य वाटायला नको असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

ते म्हणाले की, नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने २०% वाटा उचलण्याला मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महारेल या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांना वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, समाजकारण राजकारणात काही लोक पुढे होऊन काम करत असतात त्यांना सुरक्षा पुरविली जात असते. अशावेळी सुरक्षा काढणे योग्य नाही. याचा पुनर्विचार शासनाने करावा असे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार दिलीप बनकर यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दारू उधार देण्यास नकार दिल्याने दोघांनी केली दुकानदारास मारहाण

Next Post

पोलीस भरतीला स्थगिती; १ नोव्हेंबरपासून सुरु होणार होती प्रक्रिया

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
police

पोलीस भरतीला स्थगिती; १ नोव्हेंबरपासून सुरु होणार होती प्रक्रिया

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011