नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यात मानोरी खुर्द येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळत खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी खूनकरून घटनास्थळावरून फरार झाला होता. पण, येवला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे दाम्पत्य मूळचे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी असून हे दोघेही शेतात मोलमजुरी करुन आपली उपजिविका करत होते. पत्नी आशा वास्कली आणि पती प्रेमा वास्कली हे दाम्पत्य ही दोघांची नावे आहे. पती प्रेमाच्या डोक्यात संशयाचे भूत शिरल्यामुळे तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. या संशयातून त्याने पत्नीला आधी दारु पाजून पत्नीची गळफास लावून हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला. दुसऱ्या दिवशी हे दोघे शेतावर आले नाही म्हणून शेतकरी पाहण्यासाठी घरी गेल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली. त्यानंतर लासलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.