निफाड – तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीर जवान रंगनाथ पवार यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असतांना वीर मरण आले. महाजनपूर सारख्या छोट्याश्या खेड्यातून पुढे येत जवान रंगनाथ पवार यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अतिशय कठोर परिश्रम घेऊन ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रध्दांजली अर्पण करतांना सांगितले की, भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान रंगनाथ पवार यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.