निफाड – मार्च महिना हा सर्व शासकीय कार्यालयाचा थकबाकी वसुली असल्याने महावितरण निफाड उपविभागातील सर्व अभियंते, जनमित्र, बिलिंग मधील कर्मचारी, यंत्रचालक व बाह्य स्त्रोत कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून शेती पंप ग्राहकांना संबोधित करून मार्च महिन्यामध्ये कृषी वीज धोरण २०२० या योजनेअंतर्गत ४ कोटी ७५ लाख रुपये शेतीपंपाची थकबाकी वसुली केली व आतापर्यंत संपूर्ण योजनेमध्ये ७५०० ग्राहकांनी १३ कोटी रुपये वीज बिल भरलेले आहेत..
शासनाने कृषी ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित न करण्याबाबत तीन महिने मुदतवाढ दिल्याने, ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित न करता माउथ टू माउथ पब्लिसिटी, फलक प्रसिद्धी, पत्रके वाटप करणे, सोशल मीडिया असा प्रभावी वापर करून तसेच वाहन फेरी द्वारे व गाडीवर लावलेल्या स्पीकर सिस्टीम द्वारे जनजागृती करणे, विविध बैठका घेऊन, सप्ताह, कीर्तने, प्रवचने या माध्यमातून ग्राहकांपर्यंत कृषी वीज धोरण २०२० ही योजना पोहचविणे असे विविध उपक्रम उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी व त्यांचे सर्व अभियंते व कर्मचारी यांनी संपूर्ण निफाड उपविभागातील प्रत्येक गावांमध्ये राबविले. त्याचाच परिपाक म्हणून नाशिक मंडळामध्ये निफाड उपविभागाने अव्वल स्थान प्राप्त केले.
सदर वसुलीचे नियोजन व संकल्पना नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दीपक कुमठेकर साहेब व मा.अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर साहेब व कार्यकारी अभियंता श्री रवींद्र आव्हाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे, अभियंते कुशारे, पाटील, महाजन, मोरे, चव्हाण, निरगुडे व जनमित्र व यंत्रचालक चौधरी, हांडगे, भोर, पवार, चव्हाण, गोसावी, बागुल, दुधाने आहेर पगारे हिरे शेख दिघे, निफाडे, माळी,घमे, पेकळे, शिंदे व इतर सर्वांनी थकबाकी वसुलीसाठी प्रचंड मेहनत घेतली…