नाशिक – निफाड तालुक्यातील लोणवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुणाल गायकवाड (४) आणि गौरव गायकवाड (७ ) असे या दोघां भावाचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुणाल आणि गौरव हे दोघे भाऊ खेळत असताना ते शेततळ्याकडे गेले. खेळत असतांनाच शेततळयात कुणाल पाण्यात पडला. त्याला वाचवायला गौरवने देखील उडी मारली. पण, दोघांना या पाण्यातून बाहेर येता आले नाही. त्यामुळे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गावात कळतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.