आकाश श्रीवास्तव
निफाड – निफाड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निफाड नगरपंचायत सभागृहात पीठासीन अधिकारी तहसीलदार शरद घोरपडे तसेच मुख्याधिकारी डॉ. श्री या देवचक्के यांच्या उपस्थितीत विविध विषय समित्या व स्थायी समितीची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापती पदाचा बहुमान नगराध्यक्षा सौ. रुपाली विक्रम रंधवे यांना देण्यात आला. स्थायी समितीचे सदस्य म्हणून अनिल पाटील कुंदे, सौ पल्लवी महेश जंगम, संदीप जेउघाले, किशोर ढेपले, साहेबराव बर्डे यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समिती मध्ये सभापती म्हणून किशोर ढेपले यांची निवड करण्यात आली तर अरुंधती पवार, डॉ. कविता धारराव, सौ रत्नमाला कापसे, जावेद शेख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
महिला व बालकल्याण समिती च्या सभापती पदी सौ. पल्लवी जंगम तर सदस्य म्हणून सौ सुलोचना होळकर, सौ अरुंधती पवार आणि सौ. विमल जाधव यांची निवड करण्यात आली. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व सांस्कृतिक कार्य समिती च्या सभापती पदी साहेबराव बर्डे आणि सदस्यपदी सौ कांताबाई कर्डिले, सौ.अरुंधती पवार, डॉ. कविता धारराव, सौ. विमल जाधव यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी संदीप जेऊघाले आणि सदस्यपदी सौ रत्नमाला कापसे, सौ अलका निकम, सौ.शारदा कापसे, आणि सागर कुंदे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे आणि सदस्यपदी सौ सुलोचना होळकर, डॉ. कविता धारराव, सौ कांताबाई कर्डिले व सौ. शारदा कापसे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार, विक्रम रंधवे देवदत्त कापसे आसिफ भाई पठाण नंदकुमार कापसे दीपक गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते.