निफाड – नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील निफाड जवळ कादवा नदी पुलावर बुधवारी विचित्र अपघात झाला. या पुलावर वाळू वाहून नेणारा हायड्रोलिक हायवा ट्रकचा मागचा भाग अचानक उघडला. त्यामुळे ट्रक ड्रायव्हर केबिन थेट हवेत गेली. त्यामुळे या केबिनमधील ड्रायव्हर अडकला. या अपघात बघण्यासाठी पुलाच्या आजूबाजूला मोठी गर्दी झाली. ड्रायव्हरही घामाघूम झाला. अखेर या पुलावर एक टेम्पो आला. त्या टेम्पोच्या सहाय्याने ड्रायव्हर बाहेर आला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. दरम्यान, ट्रक रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा भीषण अपघात झाला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
बघा हा थरारक व्हिडिओ