निफाड – निफाड नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी निफाडच्या भूमिकन्या डॉक्टर सविता राहुल तातेड यांची एक मताने निवड करण्यात आली. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पार पडल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या दोन जागा या सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या पात्र व्यक्तींसाठी ठेवण्याची तरतूद आहे. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार निफाड शहरातून डॉ. सविता तातेड आणि संदीप भाऊसाहेब शिंदे यांनी विहित मुदतीत मध्ये आपले अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. या निवडीची प्रक्रिया निफाड नगरपंचायतीच्या सभागृहात विधिवत पद्धतीने संपन्न झाली.
पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शरद घोरपडे आणि आणि नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीया देवचके यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये १७ पैकी १६ नगरसेवकांनी आपला सहभाग नोंदविला. या बैठकीत डॉक्टर सौ. तातेड यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून एकमताने निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले दुसरे उमेदवार संदीप शिंदे यांच्या अर्जाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण कापसे, जावेद शेख आणि सागर कुंदे यांनी हरकत घेतली. शिंदे यांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी संदीप शिंदे यांचा अर्ज बाद ठरविला. त्यामुळे दोन पैकी फक्त एकाच जागेसाठी निवड प्रक्रिया पार पडली.
या बैठकीसाठी नगराध्यक्ष सौ रूपाली रंधवे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, आणि नगरसेवक सौ पल्लवी जंगम, संदीप जेऊघाले, श्री किशोर ढेपले, साहेबराव बर्डे , डॉ. कविता धारराव, सौ रत्नमाला कापसे, अरुंधती पवार, सौ सुलोचना होळकर, सौ.विमल जाधव, सौ शारदा कापसे, सौ.अलका निकम हे उपस्थित होते. डॉ. सौ. तातेड यांच्या निवडीची घोषणा होताच नगरपालिका सभागृहात ग्रामस्थांच्यावतीने सौ तातेड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, राजाभाऊ राठी, नंदलाल चोरडिया, विक्रम रंधवे, संपत डुंबरे, सुनील भुतडा, अभीजीत चोरडिया, मधुकर शेलार, नंदलाल बाफणा, सुधीर कराड, सौ. चोरडीया, शिवाजी ढेपले, देवदत्त कापसे, नंदकुमार कापसे, आसिफ भाई पठाण, एडवोकेट सरपंच प्रवीण ठाकरे, प्रविन कराड, एडवोकेट शिवाजी भोई, मोहन जाधव, आदींसह मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सौ. सविता तातेड या निफाड येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सहकार तज्ञ नंदलालजी चौरडीया यांच्या कन्या आहेत.