निफाड – तालुक्यातील उंबरखेड गावठाणाच्या शिवारात कादवा नदीत पोहत असताना एका ५५ वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांनी आज शुक्रवारी दिली आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील उंबरखेड गावठाण शिवारातील कादवा नदीत साकोरे मिग येथील सुखदेव राजाराम पवार वय वर्ष पंचावन्न हे कादवा नदीत पोहत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तशी खबर श्रावण विश्वनाथ नेहरे यांनी पिंपळगाव पोलिसांना दिली. पिंपळगाव बसवंत पोलीस याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पाटील हे करत आहेत , या घटनेमुळे साकोरे मिग परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.