निफाड: पत्रकार समाजाचे प्रतिबिंब आहे त्यातुन अडिअडचणी शासन प्रशासनाच्या समोर आणतात द्राक्ष उत्पादकांची दरवर्षी फसवणुक होते हे माध्यमातुन स्पष्ट होत असते हि फसवणुक टाळण्यासाठी आपण कटिबध्द आहोत असे प्रतिपादन नाशिकचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले. निफाड येथील रुद्राय हाँलमध्ये आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणुन पाटील बोलत होते निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते अध्यस्थानी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसगार हे होते मंचावर आमदार दिलीप बनकर माजी आमदार अनिल कदम स्व शांतीलालजी सोनी पतससंस्थेचे चेअरमन शशांक सोनी ,द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले पंचायत समिति सदस्य शिवा पा सुराशे प्रमुख वक्ते नाशिकचे पुरवठा निरिक्षक डाँधर्मेंद्र मुल्हेरकर पत्रकार.धनःश्याम पाटील पत्रकार संघाचे संस्थापक यशवंतराव पवार निफाडचे पोलिस निरिक्षक रंगराव सानप माजी नगरसेवक अनिल पा कुंदे रायुकाँचे
सागर पा कुंदे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करुन पत्रकार दिनास प्रारंभ झाला प्रस्ताविक पत्रकार अँड रामनाथ शिंदे यांनी केले मान्यवरांचा स्वागत सत्कार पत्रकार संघाचे वतीने शाल पुष्पगुच्छ व फेटा बांधुन करण्यात आला निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्व माधवराव गडकरी उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार चपराक प्रकाशन पुणेचे पत्रकार घनशाम पाटील यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला युवा कवी राजेंद्र सोमवंशी ,युवा पत्रकार सागर निकाळे यांनाही सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आमदार दिलीप बनकर ,माजी आमदार अनिल कदम कैलासराव भोसले शिवा पा सुराशे यांनी मनोगतातुन पत्रकारीतेतील स्थित्यंतर व स्पर्धेत टिकुन राहणारी युवा पिढी यावर मत व्यक्त करुन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या निफाड तालुक्यातील जुन्या जेष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे महनीय वक्ते डाँ धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी मनोगतात पत्रकारांची वाढलेली जबाबदारी अधोरेखित केली जुन्या काळातील पत्रकारीता बदलत गेली तरी लेखणीचे महत्व अद्यापही टिकुन आहे ते काम पत्रकार शाश्वतपणे करत आले आहे पत्रकारीता हा समाजरचनेचा महत्वाचा गाभा असल्याचे विविध दाखले देऊन पटवुन दिले. अध्यक्षीय भाषणात ना बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले समाजाभिमुख पत्रकारीता ही काळाची गरज बनली आहे विविध समाजमाध्यातुन पत्रकार तयार होताहेत तरिही पत्रकारांचे महत्व हे पुर्वीप्रमाणे टिकुन आहे असे नमुद केले
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, तालुकाध्यक्ष सोमनाथ चौधरी,कार्याध्यक्ष योगेश अडसरे,उपाध्यक्ष उत्तम गोसावी, सुभाष गायकवाड ,सरचिटणीस निलेश देसाई, सहचिटणीस रोहित राजोळे, खजिनदार सागर निकाळे, सहखजिनदार राकेश बनकर , संघटक तुषार झोडगे,सहसंघटल सागर आहेर ,समन्वयक राहुल कुलकर्णी,सदस्य अण्णासाहेब गुरगुडे, संजय भागवत,दिपक घायाळ, पंढरीनाथ सोनवणे, डि बी काद्री, हारुण शेख, अरुण खांगळ, नामदेवराव रायते,बाळासाहेब वाघ, गणपतराव हाडपे, दत्तात्रेय वाळुंज ,प्रभाकर सायखेडकर,लक्ष्मण पडोळ, सुदर्शन सारडा ,सुभाष गडाख ,अरुण डांगळे ,माणिकराव देसाई, संजय साठे, सुनिल कुमावत, किशोर सोमवंशी, उमेश पारिख, समिर पठाण, असिफ पठाण , दिलिप घायाळ, चंद्रकांत जगदाळे, विकास भोसले ,जगन्नाथ जोशी,बाजीराव कमानकर ,एम बी राऊत आदींसह निफाड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार अँड रामनाथ शिंदे यांनी सुत्रसंचालन केले तर राजेंद्र आहेर यांनी आभार मानले.