शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड येथे आग लागून ९ दुकाने भस्मसात; १ कोटी ३० लाखांचे नुकसान

by India Darpan
सप्टेंबर 7, 2021 | 6:34 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210907 WA0216 1

निफाड – मंगळवार पहाटे दीड वाजेच्या सुमारास शहरातील उगाव रोडवरील शॉपिंग सेंटरला आग लागून ९ दुकाने भस्मसात झाली. या अग्नितांडवामध्ये एक कोटी तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निफाड शहरातील उगावरोड या वर्दळीच्या रस्त्यावरील ठाकरे शॉपिंग सेंटर मधील व्यापारी गाळ्यांना पहाटे एक ते दीड वाजेच्या सुमारास आग लागली. बंद असलेल्या दुकानांमधून धूर येत असल्याचे जवळच्याच एका हॉटेल कामगाराच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करून नागरिकांना आग लागल्याची माहिती दिली. उपस्थित नागरिकांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

निफाड नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर, पिंपळगांव बसवंत आणि नाशिक येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत नवीनच व्यवसाय सुरु झालेल्या व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकूण ९ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या अग्नितांडवामध्ये सीताराम गायकवाड यांचे सनिज मेन्स पार्लर, सोहेब शेख यांचे कापड दुकान, राजेंद्र खैरे यांचे ईश्वरी ऑटो सेंटर, सौ. रुपाली निफाडे यांचे समृद्धी ट्रेडर्स, विजय निफाडे यांचे वसुंधरा हार्डवेअर, आरिफ अन्सारी यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स, विकास कसबे यांचे श्री साई दूध संकलन केंद्र, सचिन ढेपले यांचे मल्हार खानावळ, संतोष सोळसे यांचे सोळसे इलेक्ट्रिकल्स यांचा समावेश आहे.

घटनास्थळी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. महसूल खात्याचे मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे व तलाठी खंडांगळे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. निफाड शहरामध्ये आग विझवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने तसेच बाहेरून अग्निशमन दलाचे वाहने येण्यास उशीर झाल्याने आगीची दाहकता जाणवली. निफाड शहरात तातडीने अग्निशमन यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

Next Post

सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर परीक्षा

Next Post
Uday samant 1 640x375 1

सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर परीक्षा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011