निफाड – निफाड न्यायालयाचे आवारात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये निफाड न्यायालातील प्रलंबित असलेल्याला प्रकरणांपैकी एकूण १५६६ प्रकरणे तडजोडी कामी ठेवण्यात आली होती त्यापैकी एकूण ५२४ प्रकरणे सामोपचाराने तडजोड होऊन रु ५,९९,६९,४४७ ची वसूल करून निकाली करण्यात आली तसेच ३९९३ दाखल पूर्व प्रकरणापैकी १९२३ प्रकरणांमध्ये तडजोडीद्वारे ३,५९,८१,१६१ रुपयांची अशी एकूण साडेनऊ कोटी वसुली करण्यात आली.
जिल्हा न्यायाधीश -१ आर .जी वाघमारे,अति.जिल्हा न्यायाधीशपी.डी.दिग्रसकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एस. जहागीरदार, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती. वाय. डी. बोरावके, दुसररे सह दिवाणी न्यायाधीश एस.बी.काळे, तिसरे सह न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.डब्ल्यू.उगले, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. एन. गोसावी यांच्या समेट पॅनलमध्ये दोन वकील सहभागी झाले होते. लोकन्यायालयाची संकल्पना ही समेटातुन वाद तंटे मिटविण्याची आहे वकिल पक्षकारांसह बँका पतसंस्था, महावितरण कंपनी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय लोकन्यायालयात सहभाग नोंदवत खटले वाद मिटविण्यासाठी प्रतिसाद दिला. निफाड वकिल संघाचे अध्यक्ष अॅड ए.व्ही.आवारे , उपाध्यक्ष अॅड.शरद नवले,अँड आर एल कापसे अँड आर बी शिंदे ,सचिव अॅड. रामेश्वर कोल्हे, खजिनदार अॅड चेतन घुगे,अॅड गौरव शिंदे, अॅड योगीता शिंदे,अँड आर एल कापसे अँड आर बी शिंदे जिल्हा न्यायालयाचे अधिक्षक अनिल राहाणे, सहा. अधीक्षक संजय जेजुरकर ,श्रीमती.भोजने,श्रीमती कुलकर्णी,श्रीमती रणशेवरे, वरिष्ठ लिपिक श्रीमती.अपर्णा पाटील,किशोर जावरे, बोराडे,संगणक अभियंता, स्वप्नील भालेराव, श्री. बस्ते,यांच्या सह सर्व वकील पक्षकार तसेच निफाड न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.