निफाड – तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची वाटचाल भक्कमपणे सूरु आहे. तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनीधिंच्या अनास्थेमुळे तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या वाढल्या आहे. मात्र गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या विजेसह अन्य समस्या सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन माजी आमदार अनिल कदम यांनी केले. निफाड तालुक्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियानाप्रसंगी मंगळवारी माजी आ.अनिल कदम यांनी गोदाकाठच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते तळवाडे वाचनालयात बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य, करंजगावचे मा.सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गोदाकाठच्या पिंपळगाव निपाणी, सावळी, बेरवाडी, चाटोरी, तळवाडे, महाजनपूर आदी गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थांशी अनिल कदम यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. बेरवाडी व पिंपळगाव निपाणी शेतकऱ्यांनी विजेच्या प्रचंड तक्रारी करत स्वतंत्र सबस्टेशन कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे सांगितले. माजी आमदार अनिल कदम यांनीही त्यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी पत्रव्यवहार करून गोदाकाठच्या वीज समस्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन वीज समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा शिवसंपर्क अभियानाचा मुख्य उद्देश असून शिवसैनिकांनी हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी यावेळी केले. गोदाकाठच्या या शिवसंपर्क अभियानप्रसंगी बेरवाडीचे सरपंच खैरणार सर, अंबादास जामकर, पिंपळगाव निपाणीचे सरपंच शिवाजी खाडे, सावळीचे मा.सरपंच मुरलीधर बोडके, चाटोरीचे दिलीपराव कदम, तळवाडेचे सरपंच राजेश सांगळे सर, महाजनपूरचे जेष्ठ शिवसैनिक सावकारबाबा फड, मा.सरपंच बचवंत फड, संदीप फड यांच्यासह बेरवाडीचे बस्तीराम खालकर, अंबादास जामकर, भावड्या खालकर, राहुल थेटे, रोशन पवार, अमोल पवार, सागर पवार, तळवाडेचे अर्जुन सांगळे, संदीप सांगळे, राजू सांगळे, संपत सांगळे, विठ्ठल गवते, बाळा सांगळे, सावळीचे किरण जाधव, शरद बोडके, आदित्य बोडके, सचिन बोडके, न्यानेश्वर गांगुर्डे, पिंपळगाव निपाणीचे सोमनाथ बांगर, नामदेव खाडे, देविदास खाडे, न्यानेश्वर बोडके, वसंत नाईक, भाऊसाहेब बांगर, महाजनपूरचे संदीप फड, बाळू फड, संपत फड, सोमनाथ शिंदे, रवींद्र दराडे, विनायक टिळे, मंगेश शिंदे, गणपत फड आदी शिवसैनिक उपस्थित होते.