कोरोना काळात डॉक्टरच खरे देवदूत : अनिल कदम
निफाड – गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाशी सगळे जण झुंज देत आहेत. मात्र अद्यापही कोविडचा धोका कायम आहे त्यामुळे सर्वांनी सावध आणि सजग रहावे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोदाकाठमध्ये वैद्यकीय सेवेसाठी धावून आलेले डॉक्टरच खरे देवदूत आहेत, असे प्रदीपादन माजी आमदार अनिल कदम यांनी केले.
सोनगाव ग्रामपंचायतिच्यावतीने आज शुक्रवारी गोदाकाठच्या कोविड योद्ध्यांचा माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा योगेश गावले होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिप सदस्य सुरेश कमानकर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चारोस्कर, डॉ. प्रल्हाद डेर्ले, गोकुळ गीते, डॉ सारिका डेर्ले, संजय दाते, खंडू बोडके-पाटील, सोनगावचे उपसरपंच संजय मुरादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोदाकाठमध्ये कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा व आशा स्वयंसेविकांचा सत्कार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
या कोविडयोद्धयांचा झाला सत्कार
डॉ प्रल्हाद डेर्ले, डॉ. नितीन गीते, डॉ.भारत पाटील, डॉ. चेतन कातकाडे, डॉ. सारिका डेर्ले यांच्यासह सचिन गावले, प्रियंका पवार, जया ताकतोडे, साहेबराव गावले, अनिल बोराडे, शरद दळवी, प्रशांत कांडेकर, सागर गावले, तुषार घुगे, हेमंत दळवी, राजेंद्र पवार, अनिल महाजन, सुनील वाघ, शीतल जमधडे, हेमंत सावंत, योगेश केकान या डॉक्टरांसह सागर खालकर, अहिरे, कहांडळ, गणेश खिंडे, येवले सर, तलाठी हिरे, ग्रामसेवक कुमावत, ग्रामपंचायत कर्मचारी बापू खालकर, समाधान जाधव, बाळू कारे, आकाश कारे, आशा स्वयंसेविका मनीषा देशमुख, वैशाली जाधव, वैशाली देवकर, सुनंदा शेलार यांचा कोविडयोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
डॉक्टरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी अनेक डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांनी केले. प्रास्ताविक सुधाकर गावले यांनी तर आभार रोहिदास गाडे यांनी मानले. यावेळी योगेश गावले, नाना खिंडे, धोंडीराम मुरादे, योगेश गाडे, शिवाजी गावले, अनिल दजगुडे, वसंत कांडेकर, संपत गावले, केदु पवार, रतन कांडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.