निफाड – निफाड विधानसभा मतदार संघातील २४ गावांना माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने जलजीवन मिशन योजनेच्या कृती आराखड्यात समावेश केल्याने लवकरच या नळपाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे या चोवीस गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
गेल्यावर्षी आक्टोबरमध्ये अनिल कदम यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन २४ गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी साकडे घातले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांच्याकडे अनिल कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या गावांचा जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश केला आहे. यापूर्वीही माजी आमदार अनिल कदम यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २६ गावांना मंजूर केलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
निफाड तालुक्यातील नव्याने जलजीवन मिशन कृती आराखड्यात समाविष्ट केलेल्या चांदोरी पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी ५७ लक्ष, आहेरगाव ९७ लक्ष, उगाव २ कोटी ४५ लक्ष, वडाळीनजीक ९७ लक्ष, भुसे ७५ लक्ष, अंतरवेली ६४ लक्ष, चाटोरी ८८ लक्ष, दात्याने २ कोटी २७ लक्ष, दावचवाडी एक कोटी ५ लक्ष, शिवडी एक कोटी, सुंदरपूर ४१ लक्ष, नांदूर्डी २ कोटी ८ लक्ष, पालखेड एक कोटी ८८ लक्ष, रानवड एक कोटी ५८ लक्ष, सायखेडा-गोदानगर २ कोटी ८३ लक्ष, पिंपळगाव निपाणी ९६ लक्ष, कसबे सुकेने ४ कोटी ८० लक्ष, मौजे सुकेने एक कोटी ४५ लक्ष, पाचोरेवणी एक कोटी २५ लक्ष, लोणवाडी ६५ लक्ष, खेडे एक कोटी ८ लक्ष, मांजरगाव ३८ लक्ष, जिव्हाळे ५६ लक्ष, शिंपी टाकळी ६८ लक्ष रुपयांची अंदाजपत्रकात तरदूत करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या योजनांची सद्यस्थिती लक्षात घेऊन नवीन आराखड्यातील कामांना पाणीपुरवठा विभागाकडून लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती अनिल कदम यांनी दिली.!
लवकरच मंजुरी