लासलगाव – पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलगा साहिल उर्फ दादू लुकमन पिंजारी (६) याचे अपहरण करून त्यास स्वतःचे राहत्या घरात चेहऱ्यावर गादी ठेऊन नाक तोंड दाबून खून केल्याप्रकरणी येथील भिकन नजीर पिंजारी यास निफाड येथील जिल्हा व सत्र. न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा भागात लुकमन गणी पिंजारी यांचा सहा वर्षे वयाचा मुलगा साहिल लुकमन पिंजारी उर्फ दादू याचे भिकन नजीर पिंजारी याने अपहरण केले व राहत्या घरामध्ये दिनांक २५ जून २०१७ रोजी रात्री साहिल उर्फ दादू लूकमन पिंजारी याच्या तोंडावर गादी ठेवून दोन दाबून खून केला. याबाबत साहिल दिसत नसल्याने त्याचे वडिल लुकमन गणी पिंजारी यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात हरविल्याची खबर दिली होती.परंतु पोलिस तपासात त्यांच्याच पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा गल्लीतील. भिकन नजीर पिंजारी याने दिनांक २५ जून २०१७ रोजी सहीलचे अपहरण करून स्वतःचे घरात सहिलचे तोंडावर गादी ठेवून नाक आणि तोंड दाबून जीव ठार मारून खून केल्याचे समोर आले होते. त्यानंतर भिकन पिंजारी यास मदत करणारी आई अमिनाबी नजीर पिंजारी (८४) या दोघांविरोधात भारतीय दंड विधान कलम ३६३ व ३०२ अन्वये निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे समोर सुरु झाले. जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. आर.एल. कापसे यांनी तपास अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, यांच्यासह सतरा साक्षीदार तपासून परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे सरकारी पक्षातर्फे शाबीत केले. तसेच न्यायालयाने आरोपी क्रमांक दोन अमीनाबी नजीर पिंजारी या वयोवृध महिलेचा मुक्तता केली. साहिलचे अपहरण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी व भारतीय दंड विधान कलम ३०२ जन्मठेप पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा न्यायाधीश आर जी.वाघमारे यांनी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट आर. एल. कापसे यांनी सरकार पक्षाची प्रभावीपणे बाजू मांडली तसेच या खटल्याचा पिंपळगाव पोलीस निरीक्षक देसले व शेवाळे यांनी तपास करून खटला दाखल केला होता या खटल्यात पोलीस पैरवी म्हणून पिंपळगावचे पोलीस कार्यालयाचे पोलीस हवालदार रत्नाकर बागुल यांनी काम पाहिले.