निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नैताळे येथे मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गणेश मंदिरातील गणेश मूर्तीची विटंबना केली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. आक्रमक ग्रामस्थांनी नैताळे येथील राज्यमार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. निफाड पोलिसांच्या आश्वासानंतर ग्रामस्थांनी हा रास्ता रोको मागे घेतला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पटारे यांनी आपल्या फौज फाट्यासह आंदोलनस्थळी तातडीने दाखल झाले. अज्ञात समाजकंटकविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन पटारे यांनी आंदोलक ग्रामस्थांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निफाड पोलीस त्या समाजकंटकांचा शोध घेत आहेत. कायदा व सुव्यस्था अबाधीत राहावी यासाठी ग्रस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे-
Niphad Ganesh Murty Idol Rural People Agitation