शनिवार, सप्टेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

निफाडमध्ये साकारले एक हेक्टरवर अप्रतिम फॉरेस्ट गार्डन; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 25, 2021 | 10:25 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211025 WA0032

नाशिक – जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक यासोबतच नैसर्गिक समृद्धीचा वारसा लाभला आहे. देशपातळीवर आदर्श ठरेल असे निफाड तालुक्यात वन उद्यान वनविभागाने तयार केले असून या वन उद्यानाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर भर देण्यात यावा, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज वनविभागाच्या वतीने निफाड येथील नर्सरीजवळ तयार केलेल्या वन उद्यान व मानव बिबट सहजीवन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी आमदार दिलीपराव बनकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह वन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जंगलक्षेत्र कमी झाल्याने वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत आहे. परिणामी मानव वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे पाहवयास मिळते. भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी मानवाला वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाची कास धरावी लागणार आहे. नागरिकांना निसर्ग जवळुन समजुन घेता यावा व भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, यासाठी हे उद्यान वरदान ठरणार आहे. तसेच जिल्ह्यात वन पर्यटनाचा विकास केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होणार आहे. याबरोबरच शालेय जीवनापासूनच वन उद्यानाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचे धडे देऊन वन्यजीव व प्राण्यांबद्दल सहानुभूतीची व संरक्षणाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या उद्यानांमध्ये प्राणिमात्रांचा अधिवास दाखविण्यात आला असून, एक हेक्टरमध्ये उभारण्यात आलेल्या या उद्यानामध्ये चिल्ड्रन पार्कमध्ये विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. विविध सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जिम, औषधी वनस्पती असे सुंदर उद्यान याठिकाणी उभारण्यात आले आहे. अतिशय कमी वेळात व कमी खर्चात उभारण्यात आलेल्या या आकर्षक व माहितीपूर्ण उद्यान निमिर्तीसाठी वन विभागतील अधिकारी व कर्मचारी यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे.

आमदार दिलीप बनकर म्हणले की, भविष्यात या वन उद्यानाच्या माध्यमातून शाळेतील मुलांना पुस्तकी माहिती सोबतच प्रत्यक्षात वन्य प्राणी व पक्षी यांच्या संदर्भात माहिती मिळणार आहे.त्यामुळे हे उद्यान येणाऱ्या भावी पिढीसाठी देखील माहितीपूर्ण आकर्षणाचा बिंदू ठरेल असेही आमदार श्री. बनकर यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात वन विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच मनमाड वन परिक्षेत्र, राजापूर परिमंडळ वन परिक्षेत्र येवला,नांदगाव वनपरिक्षेत्र व चांदवड वनपरिक्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते गौरविण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सॅमसंग युझरसाठी महत्त्वाचा अलर्ट; कंपनी करणार ही सेवा बंद

Next Post

पाक सीमेवर राहणाऱ्या नागरिकाचा अमित शहा जेव्हा मोबाईल नंबर घेतात आणि त्यालाही देतात…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
Next Post
Capture 31

पाक सीमेवर राहणाऱ्या नागरिकाचा अमित शहा जेव्हा मोबाईल नंबर घेतात आणि त्यालाही देतात...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011