निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील धानोरे येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर या लष्करी जवानाचा शिंर्डी येथून दुचाकीवरुन परत येत असतांना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ते शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करुन आपल्या नातेवाईकांकडे जात असतांना ही घटना घडली. श्रीराम यांच्यासोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे यालाही जबर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी शिर्डी येथे साई संस्थान सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादम्यान रुग्णालयात श्रीराम यांची प्राणज्योत मालवली.
पंचवीस दिवसांपूर्वी श्रीराम गुजर हे सुट्टीवर आले होते. ते शिर्डी येथून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना दुचाकी पल्सर गाडीचा अपघात सिन्नरजवळ पाथरेगावाजवळ झाला. आज श्रीराम यांच्यावर धानोरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीराम हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर कोर 236 IWT युनिट मध्ये गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते. ते नातेवाईकांना भेटून मंगळवार १८ जुलै रोजी आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते. परंतु दुर्दैवाने तत्पूर्वीच काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात आजोबा संतु, आई अनिता, शेतकरी वडील राजेंद्र, भाऊ नितिन, बहीण प्रियंका असा परिवार आहे.