निफाड – कोरोना संक्रमाणाची दाहकता लक्षात घेता .खासदार डॉ.भारती पवार यांनी निफाड तालुक्याची आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत निफाड तालुक्यातील कोविड सेंटर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कशाप्रकारे रुग्णांची काळजी घेते, सद्यस्थितीत किती रुग्ण ॲडमिट आहेत. तसेच तालुक्यातील किती रुग्ण घरीच उपचार घेता येत याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे बाधित रुग्णांची ट्रेसिंग कशा प्रकारे केले जाते त्याची सविस्तर माहिती घेतली. rt-pcr टेस्ट कुठल्या कुठल्या शहरात सुरू आहेत .त्या रोजच्या किती प्रमाणात होतात याची आकडेवारी घेतली असता .त्याची संख्या अतिशय नगण्य असल्याचे सांगत निफाड ,चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगाव इत्यादी ठिकाणी लवकरात लवकर आरटीआरपीसीआरच्या टेस्ट सुरू करण्यात याव्यात अशी सूचना ही खा. डॉ .भारती पवार यांनी केली.
त्याचप्रमाणे घरातच विलगिकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यात यावा अशा नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. त्यांना फिरण्या पासून मज्जाव करण्यात यावा त्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहावे .निफाड पिंपळगाव ,लासलगाव या ठिकाणी एकूण किती ऑक्सिजन बेड आहेत,किती वेंटीलेटर उपलब्ध आहे व किती रुग्ण ऍडमिट आहे याचा देखील आढावा घेण्यात आला. लसीकरणाच्या संदर्भात देखील दुसऱ्या डोस वर जास्तीत जास्त भर देण्यात यावा .विशेषतः को-व्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन व्हॅक्सिनेशन करावे. त्याचप्रमाणे ज्यांनी आजपर्यंत पहिला डोस घेतला आहे त्यांच्या दुसऱ्या दोस्ती नियोजन आजपासूनच सुरू करावे जेणेकरून भविष्यात दुसऱ्या डोस साठी लोकांना त्रास होणार नाही किंवा त्यांची लस घेण्याची मुदत संपणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे .निफाड तालुक्यात कोरोना काळात काम करणाऱ्या सर्वांचेच व हेल्थ वर्कर यांचे १०० व्हॅक्सिनेशन करून घ्यावे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा केली .अनेक व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांचे पैसे बुडवले त्या संदर्भात देखील पोलिस यंत्रणेने लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी व त्यांचे बुडालेले पैसे मिळवून देण्यास जास्तीत जास्त मदत करावी असे खा . डॉ. भारतीताई पवार यांनी सूचना केली. गोदाकाठ परिसरातील गावे बघता त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने थोडे अधिक लक्ष देऊन भविष्यात कोरोना आटोक्यात राहील त्या अनुषंगाने चांदोरी येथे कोविड टेस्ट चालू करण्यात यावी असे सांगितले. ओझरच्या लोकसंख्येचा विचार करता तेथेदेखील लसीकरणा व rtpcr टेस्ट वर अधिक लक्ष द्यावे. निफाड तालुक्यात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. त्याचा नायनाट लवकरात लवकर व्हावा या साठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे मग त्यात अशा वर्कर असतील आरोग्य यंत्रणा असेल पोलिस यंत्रणा असेल प्रशासकीय यंत्रणा असेल यांनी सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करावे असे प्रतिपादन ही ह्या बैठकी प्रसंगी केले.
सदर बैठकीनंतर चांदोरी येथील गोदाकाठ कोविड सेंटर ,उगाव येथील कोविड सेंटरला भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. येथून परत पिंपळगाव येथील कोविड सेंटर ला भेट देत तेथील परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना संबंधित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना केल्या .तसेच सकल जैन समाज पिंपळगाव तर्फे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रोज डबा देण्याची सुरवात खा. डॉ भारती पवार यांचे हस्ते करण्यात आली .निफाड च्या बैठकी प्रसंगी निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार घोरपडे साहेब, गटविकास अधिकारी संदीप कराड , ओझर चे नगरपरिषद मुख्याधिकारी मेतकर साहेब, निफाड च्या नगरपंचायत च्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के , पोलीस निरीक्षक आर बी. सानप ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ चेतन काळे , डॉ. रोहन मोरे,भाजपा तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते ,भाजपा नेते शंकरराव वाघ, भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णाताई जगताप ,जगन कुटे, संजयजी गाजरे, आदेश सानप, संजय धारराव, आदी उपस्थित होते तर उगाव ,पिंपळगाव येथील कोव्हीड रुग्णालयाच्या भेटी प्रसंगी भाजपा नेते बापू पाटील, सतीश मोरे , अल्पेश पारख, डॉ.सारीका डेर्ले, डॉ. विजय डेर्ले, रमण सुराणा ,संजय वाबळे, गोविंद कुशारे प्रशांत घोडके, आबा गडाख, संदीप टर्ले, रवी सानप, विशाल पालवे, चिंधु काळे, संदीप झुटे यांचेसह अनेक जण उपस्थित होते.










