आमदार दिलीप बनकर यांनी दिली माहिती
पिंपळगाव बसवंत: निफाड विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमधील तरुणांची सातत्याने व्यायामशाळा इमारत ,व्यायामशाळा साहित्य, ग्रीनजीम साहित्याची मागणी होती त्या अनुषंगाने पहिल्या टप्यातील काही गावामध्ये जिल्हा वार्षिक योजना सन २०२०/२१ या योजनेअंतर्गत व्यायामशाळा इमारत बांधकाम व्यायाम ,साहित्य, व ग्रीनजीम साहित्य खरेदी करण्यासाठी सुमारे ५८ लाखाच्या निधीला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.
यामध्ये तालुक्यातील शिरवाडे वणी येथे व्यायामशाळा बांधकाम करणे( ७ लक्ष) गोरठाण येथे व्यायामशाळा बांधकाम करणे ( ७ लक्ष ) मुखेड व्यायामशाळा बांधकाम करणे (७ लक्ष) पिंप्री येथे व्यायामशाळा बांधकाम करणे (७ लक्ष)चितेगावं येथे व्यायामशाळा साहित्य पुरविणे (५लक्ष) नादुर्डी येथे व्यायामशाळा साहित्य पुरविणे ,पालखेड येथे व्यायामशाळा साहित्य पुरविणे ( ५ लक्ष) ,साकोरे मिग येथे व्यायामशाळा साहित्य पुरविणे (५ लक्ष) दिक्षी येथे ग्रीनजीम साहित्य बसविणे (५ लक्ष) चांदोरी येथे ग्रीनजिम साहित्य बसविणे ,(५ लक्ष) आदी गावाचा समावेश आहे.