इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही वर्षांमध्ये एकामागोमाग नवनव्या संसर्गाचा मारा सुरू आहे. एक जात नाही तोच दुसरा संसर्ग तयार असतो. अशात आता निपाहला सुरुवात झाली आहे. कर्नाटकात निपाहने थैमान घातले असून हळूहळू हा संसर्ग देशभरात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
देशातून करोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असताना आता नव्या विषाणुचा धोका वाढला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा विषाणूही संसर्गजन्य असल्याने केरळमधील काही गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसंच, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने निर्बंध आणि उपाययोजनाही जाहीर केल्या. केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात एका नऊ वर्षाच्या मुलासह चार लोकांमध्ये निपाहचे विषाणू सापडल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. बाधित भागातील काही शाळा आणि कार्यालयेही बंद करण्यात आली आहेत. यापूर्वी केरळमध्ये २०१८ आणि २०२१ मध्ये निपाह संसर्गाचा उद्रेक झाला होता.
केरळच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १४० हून अधिक लोकांची निपाह विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे. विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बाधित भागातील सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये लोकांनी मास्क घालावे, अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरावे आणि सामाजिक अंतर राखावे. राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या कोणत्याही बसेस किंवा वाहनांना बाधित भागात थांबू दिले जाणार नाही.
सात ग्रामपंचयातींवर निर्बंध
कोझिकोडचे जिल्हाधिकारी ए गीता यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. अटांचेरी, मारुथोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टीयाडी, कयाकोडी, विलेपल्ली आणि कविलुमपारा या गावांचा त्यात समावेश आहे.
Nipah Health Containment Zone Villages Kerala State
Virus