शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एचएएलला मिळालेल्या ऑर्डरमुळे नाशिकच्या उद्योजकांच्या आशा उंचावल्या; निमाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सीईओची भेट

एप्रिल 9, 2023 | 9:29 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230409 WA0238 e1681055968882

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या एचएएल कारखान्यास लाईट कॉमबॅक्ट एअरक्राफ्टच्या निर्मितीची मिळालेली ऑर्डर नाशिकची शान उंचविणारी आहे.नाशिकच्या उद्योजकांना त्याद्वारे सुटेभाग बनविण्याचे (इंडिनायझेशन)काम मिळाल्यास त्यामुळे या उद्योजकांचीही देश विकासाच्या कार्यात मोठा हातभार लागेल,असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.

एचएएल कारखान्यास गेल्या महिन्यात ८ हजार ८०० कोटी रुपयांच्या ट्रेनर विमानांच्या निर्मितीची ऑर्डर मिळाली आणि आता लाईट कॉमबॅक्ट एअरक्राफ्ट निर्मितीची ऑर्डर म्हणजे सोने पे सुहागा असेच त्याचे वर्णन करता येईल असे सांगून बेळे यांनी निमाच्या पदाधिकाऱ्यांसह एचएएलचे नूतन सीईओ साकेत चतुर्वेदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आणि त्यानंतर चर्चेच्यावेळी वरीलप्रमाणे प्रत्यक्ष मागणी केली.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना चतुर्वेदी यांनी निमाच्या कार्याचे कौतुक केले. एचएएलला जी ऑर्डर मिळाली त्याच्या सुट्या भागांचे निमाच्या सहकार्याने लवकरच खास प्रदर्शन भरविण्यात येईल, असे चतुर्वेदी म्हणाले. तसेच सुट्या भागांच्या निर्मितीचे काम नाशिकच्या उद्योजकांना देण्याबाबतच्या निमाच्या विनंतीचा विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याने नाशिकच्या उद्योजकांच्या आशाआकांक्षा उंचावल्या असल्याचे बेळे यांनी नमूद केले.

एचएएल आणि निमाचे खूप जुने संबंध आहेत. नाशिकला एचएएलचा फार मोठा व्हेंडरबेस आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न बघितले आहे. पोषक वातावरण आणि मुबलक अडलेल्या जागेचा विचार करून नाशिकला डिफेन्स हब बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने इंडिनायझेशनमध्ये सहभागी होण्याचे भाग्य नाशिकच्या उद्योजकांना लाभावे आणि येथील उद्योगव्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्यास चालना मिळावी असे निमाला वाटते असेही बेळे म्हणाले. नाशिक हे एअरकनेक्टिव्हिटीने मोठयाप्रमाणात जोडले जावे यासाठी एचएएलने दिलेले योगदान मोलाचे असल्याचेही बेळे यांनी गौरवाने नमूद केले.यावेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, कोषाध्यक्ष विरल ठक्कर, पॉवर एक्झिबिशनचे चेअरमन मिलिंद राजपूत, राजू वडनेरे आदी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतकरी व महिला वेदना मांडताना मंत्र्यांपुढे हात जोडत होत्या, ते बघून… कृषी मंत्र्यांचा नुकसान पाहणी दौरा…

Next Post

शरयू तीरी महाआरती…. भव्य आतषबाजी… आकर्षक रोषणाई… गोंधळी लोककला पथकाचे सादरीकरण…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
50x375

शरयू तीरी महाआरती.... भव्य आतषबाजी... आकर्षक रोषणाई... गोंधळी लोककला पथकाचे सादरीकरण...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011