नाशिक – नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, नाशिक जिल्हा शाखा मार्फत हाॅटेल करी लिव्हज् येथे व्यावसायिकांसाठी निरंतर शिक्षण उपक्रमांतर्गत “मधुमेह व हृदयरोग” विषयाचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. डॉ. सचिनकुमार पाटील यांनी या सत्रात मार्गदर्शन केले. या प्रसंगी नाशिकचे नवनियुक्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम व नवनियुक्त दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे उपस्थित होते. निमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सुर्यवंशी, सचिव डॉ. वैभव दातरंगे, खजिनदार डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. प्रणिता गुजराथी, डॉ. सचिन जाधव, डॉ. दिप्ती बढे, माजी अध्यक्ष डॉ. राहुल पगार व्यासपीठावर उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ. ललित जाधव यांनी केले. डॉ. विजय थेटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन सांभाळले.