बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमधील प्रलंबित सीईटीपी,एसटीपी प्रकल्प मार्गी लागणार…डॉ.अविनाश ढाकणे यांनी उद्योजकांशी साधला सुसंवाद

फेब्रुवारी 14, 2025 | 12:09 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250213 WA0320

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकसाठी आवश्यक असलेल्या सीईटीपी आणि एसटीपी प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू व ही प्रकरणे नेमकी कुठे अडली आहेत त्याचा अभ्यास व पडताळणी केली जाईल,असे प्रतिपादन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.

नाशिक दौऱ्यावर आले असता डॉ.अविनाश ढाकणे यांनी निमा सभागृहात उद्योजकांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा) तसेच अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर निमाचे नूतन अध्यक्ष आशिष नहार,आयमाचे अध्यक्ष ललित बूब,राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड,प्रशांत गायकवाड,एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार,सिमाचे अध्यक्ष किशोर राठी, महाराष्ट्र चेंबर माजी अध्यक्ष संतोष मंडलेच्या, लघु उद्योग भारती अध्यक्ष निखिल तापडिया, मेटल फिनिशर्स अध्यक्ष आशिष कुलकर्णी आदी होते.

नाशिक मधील सीईटीपी आणि एसटीपी प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून ताटकळत पडले आहेत असे माझ्या निदर्शनास आणण्यात आले आहे.इतकी वर्षे हा प्रकल्प लांबला जात असेल तर ते एक प्रकारे अपयशच म्हणावे लागेल अशी खंत व्यक्त करून उद्योग जगले पाहिजेत.धाक दाखवून घाबराविणे चालणार नाही.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ रेग्युलेटरी बॉडी असलो तरी ती फॅलीसिटेटर म्हणून काम करते याची आठवणही डॉ. ढाकणे यांनी करून दिली.भावी पिढीला चांगले वातावरण निर्माण करून देण्याची गरज आहे.हवेची व पाण्याची गुणवत्ता तसेच सामाजिक वातावरण चांगले असेल तेथे उद्योग वाढीला प्रोत्साहन मिळते असे सांगून त्यांनी पुणे शहराकडे सर्वांचेच लक्ष वेधले.उद्योगांमध्ये प्रदूषण वाढू देऊ नका असा सल्लाही त्यांनी नाशिकच्या उद्योजकांना दिला.पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नद्यांचे प्रदूषण थांबले पाहिजे.मेटल फिनिशर्स सांडपाणी प्रक्रिया करणे तसेच द्रव कचरा व्यवस्थापनावर काम करणे आवश्यक आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.एमपीसीबी पोर्टलची प्रमाणपत्रे उद्योगाने काटेकोरपणे अपडेट करावीत.सल्लागाराच्या नावाने ती करु नयेत असा निर्वाणीचा सल्लाही त्यांनी दिला.

निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविक केले. औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निमातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.नाशकात सीईटीपी आणि एसटीपीची खरी गरज आहे.आम्ही सीईटीपी फाउंडेशनची स्थापनाही केली.परंतु सिईटीपी प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. नाशिककरांचे हे स्वप्न साकार झाल्यास आम्हाला आनंद वाटेल असे नहार यांनी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास आणले. आमच्याकडे प्रदूषण करणाऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत व नाशकातील एसटीपी आणि सीईटीपी प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून का रखडले हा खरा संशोधनाचा विषय आहे. २०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन नाशिक शहर स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापासूनच प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी सांगितले.

यावेळी डॉ.उमेश शर्मा, आशिष कुलकर्णी, समीर पटवा यांनी पर्यावरण विषयक विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला डॉ.ढाकणे यांनी समर्पक उत्तरे दिली. सूत्रसंचालन मिलिंद राजपूत तर आभार प्रदर्शन राजेंद्र अहिरे यांनी केले.कार्यक्रमास स्टार्टअप इंडियाचे श्रीकांत पाटील,आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, ग्लेनमार्कचे किरण पाटील, जिंदालचे व्ही.चंद्रशेखरन, गोविंद झा, अविनाश गोखले, सचिन कंकरेज, अखिल राठी,कैलास पाटील, आदींसह विविध उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य युवा पुरस्कारासाठी या तारखे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

Next Post

मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील १ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी…मंत्री नरहरी झिरवाळ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
IMG 20250213 WA0414

मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील १ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी…मंत्री नरहरी झिरवाळ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011