रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला तातडीने MIDC प्रादेशिक अधिकारी नियुक्त करा…निमा अध्यक्ष आशिष नहार

by India Darpan
फेब्रुवारी 13, 2025 | 12:23 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250212 WA0315

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) प्रादेशिक अधिकाऱ्याची नियुक्ती रखडल्याने नाशिकमधील उद्योजकांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध शासकीय परवानग्या, भूखंड वाटप, पायाभूत सुविधा व विकास, प्रदूषण नियंत्रण, तसेच नवीन गुंतवणुकीसाठी लागणारी प्रक्रिया यासारख्या महत्त्वाच्या बाबी अधिकाऱ्याअभावी खोळंबल्या आहेत. त्यामुळे MIDC ने हा प्रश्न त्वरित सोडवून नाशिकला प्रादेशिक अधिकारी नियुक्त करावा, अशी ठाम मागणी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (NIMA) चे नूतन अध्यक्ष आशिष नहार यांनी केली आहे.

नाशिक MIDC चे मागील प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची बदली झाल्यानंतर महेंद्र साळी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांची सेवानिवृत्ती झाल्याने हे पद सध्या प्रभारी श्री जयवंत पवार यांच्याकडे आहे. मॅटमध्ये सदर प्रकरण गेल्यानंतर त्यावर निर्णय सुद्धा झालेला आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांची नियुक्ती एमआयडीसीने करावी असा मॅट ने आदेश दिलेला आहे. यानंतरही नवीन नियुक्तीसाठी प्रक्रियेत अडथळे आले असून, परिणामी, महत्वाच्या फाइल्स आणि प्रकल्प रखडले आहेत.

नाशिक MIDC हा राज्यातील एक महत्त्वाचा औद्योगिक क्षेत्र आहे. येथे लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांचे जाळे विस्तारलेले आहे. मात्र, प्रादेशिक अधिकाऱ्याच्या अभावामुळे औद्योगिक भूखंडांशी संबंधित तक्रारी, पाणी व वीजपुरवठा, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटत नाहीत. यामुळे अनेक नवे गुंतवणूकदार नाशिककडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे, असे आशिष नहार यांनी स्पष्ट केले.

सध्या उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी MIDC च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांची नाशिकसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आठवड्यातून एक दिवस नाशिकला भेट देतात आणि उद्योजकांच्या समस्या ऐकून घेतात. मात्र, “हे केवळ तात्पुरते समाधान आहे. नाशिकसारख्या मोठ्या औद्योगिक केंद्राला कायमस्वरूपी आणि पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारी असणे आवश्यक आहे,” असे आशिष नहार यांनी ठामपणे सांगितले.

नाशिक MIDC मधील उद्योजक, व्यापारी संघटना आणि गुंतवणूकदार या प्रश्नावर नाराज आहेत. अनेक तक्रारी प्रलंबित असल्याने कामांमध्ये मोठा विलंब होत आहे. “जर हा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर उद्योजकांना संघटित व्हावे लागेल,” असा इशाराही नहार यांनी दिला आहे.

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी आणि नवीन गुंतवणुकीसाठी MIDC प्रशासनाने वेगाने निर्णय घ्यावा आणि प्रादेशिक अधिकाऱ्याची नियुक्ती त्वरित करावी, अशी मागणी नहार यांनी केली आहे. “नाशिकचा औद्योगिक विकास थांबता कामा नये, त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

सीजीएसटी मुंबई विभागाने उघडकीला आणला १४० कोटींचा बनावट जीएसटी पावत्यांचा व्यवहार

Next Post
gst

सीजीएसटी मुंबई विभागाने उघडकीला आणला १४० कोटींचा बनावट जीएसटी पावत्यांचा व्यवहार

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011