नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केवळ नाशिककरांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील जनतेचे ज्याकडे लक्ष लागले आहे त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि चार दिवस चालणाऱ्या निमा इंडेक्स-24 या विराट औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन आज शुक्रवार ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे शानदार सोहळ्याने संपन्न होत आहे. सहा वर्षांच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन होत असल्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच उद्योजकांना आपली उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठविण्याची संधी उपलब्ध व्हावी,नवोदित उद्योजकांना त्यांचे कलाविष्कार सादर करता यावे,नवीन स्टार्टप्सना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट देऊन उद्योजकांचा आनंद द्विगुणित करावा,असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ लि.चेअध्यक्ष व्ही.चंद्रशेखरन, यांच बरोबर प्रायोजक टीडीकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रबल रे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी.बी.सिंग उपस्थित राहणार आहेत.
1993 पासून छोट्या स्वरूपात व मंडपामध्ये सुरू झालेल्या निमा प्रदर्शनाने आत्ता उत्तुंग शिखर गाठले आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वॉटरप्रूफ डोममध्ये आता हे प्रदर्शन भरू लागले आहे. २०१२ साली भरविण्यात आलेल्या प्रदर्शनांची उद्योग जगतात खूप चर्चा झाली होती.2018चे प्रदर्शन तर मुंबईत भरवून निमाने औद्योगिक क्षेत्राचे आम्ही राज्यातही नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करून दाखविले आहे, याची आठवणही बेळे यांनी करून दिली. कनेक्ट, कोलॉब्रेट अँड क्रिएट या त्रिसूत्री थीमवर आधारित प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला ही बाब निश्चितच अभिनंदननी आहे. चार दिवसात प्रदर्शनाला दीड लाखांहून अधिक लोक भेट देण्याची शक्यता आहे.याप्रदर्शनाची गेल्या सहा महिन्यापासून तयारी सुरू आहे.राज्यात नव्याने होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी याठिकाणी होणार आहे.प्रदर्शनातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन,अपारंपरिक उर्जा,बँकिंग,विमा,वित्त, शिक्षण, पर्यटन तसेच खास आकर्षण म्हणजे ईव्ही व ए आयची विविध उत्पादने तसेच ईव्ही वाहनांचे स्टॉल्स लोकांचे आकर्षण केंद्र ठरतील.कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांना एक प्रकारची आगळी संधीच प्राप्त होणार आहे, असेही बेळे यांनी नमूद केले.
दीपक बिल्डर्स डेव्हलपर्स हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून टीडीके, एचएएल,एसकेडीसlपीएल,बेदमुथा ग्रुप, जिंदाल,ग्रॅटिट्यूड, डब्ल्यूओडब्ल्यू,मॅग्नम हॉस्पिटल,हेसुद्धा सरप्रायोजक आहेत. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सचिव निखिल पांचाळ,कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे,सहसचिव मनिष रावल, आशिष नहार, राजेंद्र अहिरे,दिलीप वाघ,हेमंत खोंड, कैलास पाटील, नितीन आव्हाड, नाना देवरे, कुंदन दरंगे यांच्यासह निमाचे कार्यकारी सदस्य प्रयत्नशील आहेत.